
Mexico City Parliment Clash
मिडिया रिपोर्टनुसार, पारदर्शकता सुधारणांवर संसदेत चर्चा सुर होती. यावेळी विरोधकांनी जोरदार निषेध केला. यावेळी अचानक संसदेत गोंधळ उडाला आणि शाब्दिक वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.शारिरीक हिंसाचार होऊ लागला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला एकमेकांच्या झिंझ्या उपटताना दिसत आहे. यामध्ये काही पुरुष खासदार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये त्यांची चटणी बनली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर हिंसाराचा आरोप केला आहे. तसेच हिंसक मार्गांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तर सत्ताधारी पक्षाने विरोधांकवर तथ्य सांगण्याऐवजी हिंसाचार केल्याचा आरोप केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO
🚨🇲🇽 | SE AGARRARON: Diputados de la CDMX se agredieron con golpes y jaloneos en el Congreso luego de que funcionarios del narcopartido fueran acusados de violara un acuerdo tras la desaparición del órgano de transparencia de la ciudad. pic.twitter.com/00r1A4i2Do — La Derecha Diario México (@DerechaDiarioMX) December 15, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DerechaDiarioMX या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मेक्सिको सिटीत या व्हायरल व्हिडिओनंतर मोठा गोंधळ उडाला आहे. खासरांच्या अशा वर्तणूकीमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका मेक्सिने युजरने संसदेला भाजीमंडई म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने संसद जोकरांनी भरलेली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका मेक्सिन नागरिकाने देखील सर्कस वाटत आहे असे म्हटले आहे. तर अनेक मेक्सिकन नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. असे नेतृत्त्व असेल तर देशाचे काय होईल असा प्रश्न केला आहे?
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.