मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, हे एक खाजगी विमान होते. हे विमान जेट फुटबॉल मैदानावर उतरत असताना एका इमारतीवर जोरदार आदळले. मध्य मेक्सिकोतील टोलुका विमानातळाच्या ५० किलोमीटरच्या अंतरावर औद्योगिक क्षेत्राजवळ हा अपघात झाला. एक लहान खाजगी लष्करी विमान फुटबॉल मैदानावर उतरत बोते. यावेळी अचानक ते एका इमारतीवर आदळले. या अपघातानंतर मोठा भीषण स्फोट झाला आणि आग लागली.
बचाव अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रडार डेटामधून अपघाताच्या वेळी विमान गो-राऊंट म्हणजेच उंचावर उड्डाण घेतल लँडिंगचा प्रयत्न करत होते. यावेळी अचानक विमाना नियंत्रणाबाहेर गेले आणि हा अपघात घडला. तसेच प्रतिकूल हवामानामुळे देखील हा अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान फुटबॉल मैदानावर कोसळण्याचा काही क्षण दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या विमाना क्रू मेंबर्ससह १० जणांचा समावेश होता. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती मेक्सिकोच्या माध्यमांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु आगीचा भडका प्रचंड असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. आतापर्यंत ७ मृतदेह सापडले असून उर्वरित ३ जणांचा शोध सुरु आहे. परंतु या तीघांचाही मृत्यू झाला असवा असे मेक्सिको माध्यमांनी म्हटले आहे. सध्या परिसरात तात्काळ बंदी करण्यात आली असून अपघातांच्या कारणांचा सोध घेतला जात आहे.
Caught in camera : In a tragic development, a Cessna Citation III private jet near Toluca Airport, in San Pedro Totoltepec, State of Mexico. The private jet, with registration XA-PRO, carrying 10 people, two pilots and eight passengers, crashed into an industrial warehouse,… pic.twitter.com/ElKVR6Bguc — FL360aero (@fl360aero) December 15, 2025
मेक्सिकोत भयानक अपघात! डबलडेकर बसला ट्रेनची धडक अन्…; दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Ans: मेक्सिकोतील टोलुका विमानतळापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या औद्यागिक क्षेत्राच्या परिसरात, फुटबॉल मैदानाच्या जवळील इमारतीवर कोसळून विमान अपघात घडला आहे.
Ans: मेक्सिकोच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाना क्रू मेंबर्ससह १० प्रवासी होते. यातील ७ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. इतर तिघांचाही मृत्यूची शक्यता आहे.
Ans: विमानच्या रडार डेटानुसार, विमान गो-अराउंड करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु तांत्रिक बिघाड आणि प्रतिकूल हवामानामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि एका इमारतील आदळले.






