इन्फ्लुएन्सर दारा ताहचा घाम फोडणार व्हिडिओ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जगातील अनेक देशांमध्ये जिथे आदिवासी अजूनही राहतात, तिथल्या सरकारांनी लोकांना त्या आदिवासी राहत असलेल्या भागात जाण्यास मनाई केली आहे. हे यासाठी केले जाते की त्यांच्या वैयक्तिक जीवनात शहरी हस्तक्षेप होऊ नये आणि ते त्यांच्या श्रद्धा आणि रीतिरिवाजांचे पालन करू शकतील. परंतु काही लोकांना फक्त कंटेंटच्या नावाखाली आदिवासींना त्रास देणे आवडते. अलिकडेच एका व्यक्तीने असेच केले, त्यानंतर त्याला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागला.
सोशल मीडियावर प्रसिद्धी टिकविसाठी लोक किती दूर जाऊ शकतात याचे ताजे उदाहरण आयर्लंडचे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर दारा ताह यांनी सादर केले. ताह यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्यांनी इंडोनेशियाच्या पापुआ प्रदेशातील एका कथित “नरभक्षक जमाती” शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे आणि लोकांनी त्यांना वाईटरित्या ट्रोल करायला सुरुवात केली. ताह त्यांच्या ७.५ लाखांहून अधिक फॉलोअर्समध्ये धोकादायक आणि विचित्र स्टंट करण्यासाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी ४८ तास जागे राहणे आणि १२ तास चिनी वॉटरच्या छळाला तोंड देणे अशी अनेक आव्हाने पेलली आहेत परंतु यावेळी त्यांनी त्यांचा छंद वेगळ्या पातळीवर नेला आणि त्याचा नक्कीच लोकांनाही धक्का बसला आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
व्हिडिओमध्ये, ताह काही पर्यटक आणि स्थानिक मार्गदर्शक डेमीसह लाकडी होडीतून नदीवर प्रवास करताना दिसत आहे. काठावर उभे असलेले स्थानिक लोक ओरडतात आणि त्यांच्याकडे इशारा करतात. मग एका जमातीतील एक व्यक्ती धनुष्यबाण घेते आणि बोटीकडे इशारा करते. एक घाबरलेला पर्यटक म्हणतो- “असे दिसते की हे लोक भाला आपल्याकडे दाखवत आहेत.” ताह उत्तर देतो- “हे खरोखर भयानक आहे… त्यांचे भाले खूप मोठे आहेत.”
परिस्थिती नीट करण्यसाठी, ताह जमातीच्या प्रमुखाला मीठ देण्याचा प्रयत्न करतो. तो पॅकेटमधून मीठ काढतो आणि त्याच्या हातावर ठेवतो आणि नेत्याला देतो पण पानांपासून बनवलेले कपडे घातलेला आणि काटेरी भाला तिथला आदिवासी नेता मीठ चाखल्यानंतर थुंकतो आणि आणखी आक्रमक होताना व्हिडिओत दिसून आले आहे.
ताह व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो की, “असे दिसते की त्याला ते आवडले नाही… ठीक आहे मित्रांनो, आपण मागे हटले पाहिजे.” मार्गदर्शक डेमीने त्याला यावेळी इशारा दिल्याचेही दिसून आले आणि तो त्याला म्हणाला की, “आपल्याला येथून निघून जावे लागेल. हे खरोखर धोकादायक आहे. इथे थांबणं योग्य नाही.” बोट मागे सरकताच, ताह कॅमेऱ्याला म्हणतो- “खरं सांगायचं तर, हा खूप भयानक अनुभव होता.” व्हिडिओच्या शेवटी मार्गदर्शक डेमी माफी मागतो आणि म्हणतो- “मला माफ करा मी तुम्हाला इथे आणले.” धोकादायक वातावरण आणि स्पष्ट धोका असूनही, ताहने हार मानली नाही. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले- “उद्या पुन्हा प्रयत्न करेन. शुभेच्छा.”
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी ताहवर आपला राग काढला. प्रेक्षकांचे म्हणणे आहे की त्याने स्थानिक जमातीचा वापर केवळ त्याच्या कंटेंट आणि लोकांना दृष्य दाखविण्यासाठी केला. अनेकांनी मार्गदर्शक डेमीवर टीका केली की तो पर्यटकांच्या सुरक्षिततेशी आणि जमातीच्या प्रतिष्ठेशी खेळत होता असेही म्हटलं आहे.
बाप रे! महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल