Snow Fairy Video: गुबगुबीत पांढरे शरीर, इवलेसे डोळे अन् लहान चोच... या चिमणीला म्हटले जाते बर्फाची परी; पाहूनच प्रेमात पडाल
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओतील हे दृश्य नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे ठरते. अशातच आता इथे एक सुंदर आणि मनमोहक दृश्य व्हायरल झाले आहे ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जपानमधील एक सुंदर बेट होक्काइडो, त्याच्या बर्फाळ लँडस्केप्स आणि वन्य निसर्गासाठी प्रसिद्ध आहे, जे जगभरातील लोकांना आकर्षित करते. परंतु अलीकडेच, बेटावरील एका खास पक्ष्याला ऑनलाइन पाहिले गेले आहे ज्याच्या सौंदर्याने सर्वच त्यावर भारावून गेले. याच्या अद्भुत आणि आकर्षित सौंदर्यामुळे त्याला ‘स्नो फेयरी’ असे म्हटले जाते.
पक्ष्याचे नाव शिमा अनागा असून हा एक अतिशय गोंडस पक्षी आहे, जो जपानमधील होक्काइडो येथे आढळतो. हा एक लहान आणि केसाळ पांढरा पक्षी आहे. त्याचे शरीर कापसाच्या गोळ्यासारखे दिसते. गोल डोळे, गुबगुबीत शरीरयष्टी आणि गोंडस दिसण्यामुळे, शिमा एनागा पक्षीप्रेमी आणि होक्काइडोमधील स्थानिकांमध्ये फार लोकप्रिय आहे. दरम्यान नुकताच याचा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसून आला ज्यानंतर सर्वांच्या नजरा या पक्ष्यावर खिळून राहिल्या आणि लोकांनी हे सुंदर दृश्य शेअर करण्यास सुरुवात केली.
grapeejapan.com च्या अहवालानुसार, शिमा अनागा हा जपानमधील सर्वात लहान पक्षी आहे, जो त्याच्या लांब शेपटासह सुमारे १४ सेंटीमीटर लांब वाढू शकतो. त्याला ‘जपानचा सर्वात गोंडस पक्षी’ आणि ‘हिमपरी’ असे म्हणतात. त्याची तुलना अनेकदा पंख असलेल्या ‘पोकेमॉन’ शी केली जाते. हा पक्षी झाडांवर घरटे बांधतो. त्यांच्यात वातावरणात मिसळण्याचे अद्भुत गुण आहेत. ते बर्फाळ उंच ठिकाणी देखील दिसतात. त्यांचे कापसासारखे केस त्यांना थंडीपासून वाचवण्यास मदत करतात. या पक्ष्याचे पंखही मजबूत आहेत, ज्यामुळे तो वेगाने उडू शकतो. तो झाडांचा रस पितो आणि कीटक आणि कोळी खातो. तथापि, त्यांना गरुड, जे आणि कावळे यांसारख्या मोठ्या पक्ष्यांपासून मोठा धोका आहे. हे मोठे पक्षी त्याची शिकार करतात.
फक्त इथपर्यंत साथ हवी! आजीच्या नखांना नेलपेंट लावताना दिसले आजोबा; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल
दरम्यान पक्ष्याचा हा व्हिडिओ @discover.animal नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे तर हजारोंनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जपानमध्ये सर्व गोंडस प्राणी का मिळतात?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा एक बर्फाचा गोळासारखा पक्षी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.