(फोटो सौजन्य: X)
पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यातच त्यांनी चिनाब नदी आणि सिंधू नंदीचा प्रवाह रोखून धरला ज्यामुळे पाकिस्तानला पाणी मिळू नये. अशात यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची कमी निर्माण झाली. लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या बातम्या नेहमीच समोर येत होत्या मात्र आता याबाबतच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यातून पाकिस्तानचे पाणीटंचाईमुळे झालेले भीषण हाल दिसून आले. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
पाकिस्तानमध्ये बुधवारी २८ मे २०२५ रोजी युम-ए-तकबीर साजरा केला जातो. या दिवशी पाकिस्तान न्यूक्लियर पावर देश बनला, त्यामुळे या दिवशी येथे अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. पाकिस्तानने कितीही स्वतःची स्तुती केली तरी शेजारील देशातील अभिनेत्री हिना ख्वाजा बायतने तेथील व्यवस्थेचा पर्दाफाश केला आहे. पाण्यामुळे पाकिस्तानच्या कराची इंटरनॅशनल एयरपोर्टवरही पाण्याचा तुटवडा पडला आणि वॉशरूममध्ये पाण्याचा एक थेंबही उरला नाही. याचा व्हिडिओ पोस्ट करत अभिनेत्री हिना ख्वाजाने पाकिस्तानची खरी अवस्था जगासमोर आणली आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री म्हणाली, “आज युम-ए-तकबीर आहे. मी इथे कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभी आहे. ज्या दिवशी आपण पाकिस्तानच्या कामगिरीचा आनंद साजरा करायला हवा, त्या दिवशी मी पाहत आहे की येथील कोणत्याही शौचालयात पाणी नाही.” लोकांना नमाज पठण करायचे आहे, पालक त्यांच्या मुलांना शौचालयात घेऊन जात आहेत, पण तिथे पाणी नाही. त्यांनी शाहबाज सरकारला विचारले, “आपल्या संस्था आणि व्यवस्था या टप्प्यावर का पोहोचल्या आहेत?” पुढे अभिनेत्रीने सांगितले की, “या चुका आहेत आणि त्या दुरुस्त करण्याची गरज आहे हे कोणीही मान्य करायला तयार नाही. मोठे प्रकल्प केले जात आहेत, नवीन गाड्यांबद्दल बोलले जात आहे, परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाथरूममध्ये पाणी नाही हे खेदजनक आहे.”
No water in washrooms of Int’l Airport in #Karachi!
A Pakistani Women exposing the failures of system in Pakistan, Pak making big statements of major project development, but even basic amenities are missing in its Airports…its a big shame!#FailedStatePakistan @amritabhinder pic.twitter.com/5yjnVZFthM
— ManhasAnupama (@manhas_anupama) May 29, 2025
दरम्यान अभिनेत्रीचा हा व्हिडिओ हा जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. स्वतःला शक्तिशाली समजणाऱ्या पाकिस्तानात आधी महागाई आणि आता पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अभिनेत्रीने आपल्याच देशाची केलेली ही पोलखोल आता अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केली गेली आहे. हा व्हिडिओ @manhas_anupama नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मसूद अझहर, सलाउद्दीन आणि दाऊद इब्राहिम द्या आणि पाणी घेऊन जा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला पाकिस्तानच्या लोकांची खरोखर दया येते पण तुमच्यात लष्कराला हाकलून लावण्याची हिंमत नाही. तुमच्या दुर्दशेसाठी तुम्ही त्यांना दोष द्याल. पाकिस्तानच्या लोकांनो जागे व्हा आणि जिथे लष्कराला सर्वात जास्त त्रास होतो तिथेच त्यांना लाथ मारा. जय हिंद.”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.