नशीब असावं तर असं! केन विल्यमसनने षटकार मारले, दर्शकाने एका हातात झेलला बॉल अन् जिंकले 90 लाख रुपये; Video Viral
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या SA20 मध्ये दिसत आहे. किवी फलंदाज या स्पर्धेत डर्बन सुपर जायंट्सकडून खेळत आहे. विल्यमसनने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात शानदार षटकार ठोकला. चेंडू थेट प्रेक्षकांच्या गॅलरीत पोहोचला, जिथे एका प्रेक्षकाने एका हाताने तो झेलला आणि सुमारे 90 लाख रुपये जिंकले. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे, याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता नक्की व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊयात.
स्पर्धेतील दुसरा सामना डर्बन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत 209/4 धावांची मोठी धावसंख्या फलकावर ठेवली. यादरम्यान विल्यमसनने 40 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 60 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. या खेळीदरम्यान विल्यमसनने लेग साइडवर षटकार मारला, जो स्टँडवर उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकांने पकडला.
तरुणींमध्ये झाला तुफान राडा, एकमेकींच्या झिंझ्या उपटत जमिनीवर आपटले अन् हाणामारीचा Video Viral
आम्ही तुम्हाला सांगतो की, 2025 SA20 मध्ये एका हाताने बॉल झेलणाऱ्या व्यक्तीला 2 मिलियन रँडचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. विल्यमसनच्या षटकारावर घेतलेल्या झेलचा व्हिडिओ SA20 च्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला जो आता वेगाने व्हायरल होत आहे. असे सांगण्यात आले की, ज्या व्यक्तीने एका हाताने हा झेल घेतला त्याला 2 मिलियन रँड (सुमारे 90 लाख भारतीय रुपये) बक्षीस देण्यात आले आहे.
You’ll want to stick around to the end for this one… 👀
We’ve got another @Betway_za Catch 2 Million WINNER! 💰🎉#BetwaySA20 #DSGvPC #WelcomeToIncredible pic.twitter.com/hDYH4HKYVs— Betway SA20 (@SA20_League) January 10, 2025
या घटनेचा व्हिडिओ @SA20_League नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एका स्टडीममध्ये जाऊन अशी कॅच पकडायची आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एका हाताने पकडलेली ही एक उत्तम कॅच आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.