रस्ता ओलांडताना बिबट्याला दुचाकीस्वाराने उडवले, हवेत झेप घेत थेट जमिनीवर येऊन आदळला अन् मग जे घडलं ... Video Viral
राजस्थानमधील उदयपूर शहरात एका निवासी वस्तीजवळ बिबट्या दिसल्याने सर्वत्र खळबळ उडाली. रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या दूधवाल्याला धडकल्यानंतर बिबट्याचे अस्तित्व उघडकीस आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये बिबट्याची एका बाईकला जोरदार धडक होताना दिसून येत आहे.
ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास शहराजवळील शिल्पग्राम मुख्य रस्त्यावर घडली. या धडकेमुळे माणूस आणि बिबट्या दोघेही जखमी झाले.सीसीटीव्ही फुटेजमध्ये, संध्याकाळी 7.54 च्या सुमारास, एक बिबट्या सीमा भिंतीवरून उडी मारून रस्ता ओलांडण्यासाठी पळत असताना दिसला, तेव्हा दुचाकीस्वार दूधवाला आणि बिबट्याची धडक झाली, परिणामी अपघात झाला. अपघाताच्या धडकेमुळे दूधवाला खाली पडला आणि दूध रस्त्यावर सांडले, तर जखमी बिबट्याला उठून चालायला धडपड करावी लागली. अखेर बिबट्या लंगडत पळून गेला. काही वेळातच स्थानिक लोक जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी पोहोचले, परंतु बिबट्याच्या भीतीने ते मागे फिरले. तोपर्यंत बिबट्या जवळच होता आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
#Udaipur में दूध वाले की बाइक से टकराया #leopard pic.twitter.com/a1EA2004P6
— Kapil Shrimali (@KapilShrimali) February 10, 2025
बिबट्या तेथून जाताच काही वेळाने स्थानिक लोक परत आले आणि त्यातील एकाने जखमी व्यक्तीला उठून सुखरूप परतण्यास मदत केली. यानंतर त्या व्यक्तीला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. बिबट्याचे मात्र पुढे काय झाले ते व्हिडिओत सांगण्यात आले नाही. ही घटना सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याचा व्हिडिओ @UDopahar नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “गरीब बिबट्या जखमी झालेला दिसतो. त्याला शोधून काढले पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” बिबट्यासोबत फार वाईट घडले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.