(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर एका प्रियकर प्रेयसीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यात दोघेही भररस्त्यात भांडताना दिसत आहेत. एवढेच काय तर यात दोघेही एकमेकांना मारतानाही दिसून आले. दोघांमध्ये सुरु असलेला शाब्दिक वाद पुढे मोठे रूप घेतो आणि दोघेही परिस्थितीची जण न ठेवता रस्त्यालाच एकमेकांना तुडवायला सुरुवात करतात. हे तर काहीच नाही यानंतर व्हिडिओच्या शेवटी जो प्रकार घडून येतो तो तर तुम्हाला आणखीनच आश्चर्यचकीत करून सोडेल. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या या भांडणात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावर वाद घालताना दिसत आहेत. दोघेही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असून कोणत्यातरी मुद्द्यावरून त्यांच्यात वाद घालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुरुवातीला हा वाद केवळ शब्दांपुरता मर्यादित होता, मात्र जसजसा राग वाढत गेला तसतसे त्याचे रुपांतर मारामारीत झाले. यात प्रियकर चिडून प्रेयसीला जोरात कानाखाली मारतो, यानंतर प्रेयसीही मागेपुढे बघत आणि ती देखील रागात मुलाच्या कानशिलात लागवते.
लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रेयसीने थप्पड मारल्यानंतर प्रियकर आणखीनच चिडलेला दिसतो. तो आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि रागाने मुलीला जोरात जमिनीवरच पाडतो आणि रस्त्यात लटवून तिला मारहाण करू लागतो. ही संपूर्ण घटना रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांसाठी धक्कादायक होती. प्रेयसी आणि प्रेयसीमध्ये एवढी हिंसक बाचाबाची का झाली, याचे लोकांना आश्चर्य वाटले, मात्र कोणीही मध्यस्थी करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी तिथे उभा असलेला जमाव फक्त बघत होता आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.
तुम्हाला पुढे दिसेल की गर्दी वाढल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते हे दोघांच्या लक्षात आले. यानंतर दोघेही उठतात आणि काही झालेच नाही असे दर्शवत बाइकवर बसून तिथून निघून जातात. दोघांनी एकमेकांना दिलेला चोप आणि त्यांनंतरचा हा प्रकार लोकांना हादरवून सोडतो. हा सर्व प्रकार आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक आता यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हेच प्रेम असेल तर अशा प्रेमाने डुबून मारायला पाहिजे” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या प्रेमात काही इज्जत नाहीये” आणखीन एका युजरने लिहिले आहे,”हे खूपच निंदनीय आहे”. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मारामारीचा हा व्हिडिओ @world_creator_365 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.