Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

बिबट्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बिबट्याने मानवी वस्तीवर केलेल्या हल्ल्यांमुळे जुन्नरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 12:30 AM
निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीची रणधुमाळी संपली
  • बिबट्याची दहशत कायम
  • नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान
ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा नुकताच संपला आहे. सत्तासंघर्षाच्या या धामधुमीत काही काळ बाजूला पडलेला बिबट्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, बिबट्याने मानवी वस्तीवर केलेल्या हल्ल्यांमुळे जुन्नरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “मतं तर दिली, आता आमचा जीव वाचवा!” असा संतप्त सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.

 

गेल्या काही आठवड्यांपासून जुन्नरच्या कानाकोपऱ्यात निवडणुकीचे वारे वाहत होते. प्रचारादरम्यान प्रत्येक उमेदवाराने ‘बिबट्यामुक्त जुन्नर’ आणि ‘शेतीसाठी दिवसा वीज’ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मतदानाची प्रक्रिया पार पडताच बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत सिद्ध केली आहे. विशेषतः ओतूर, ओझर, डिंगोरे, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी आणि राजुरी, बेल्हे, नारायणगाव, यासह आदी पट्ट्यात बिबट्याच्या हालचाली वाढल्या असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे.

नवनिर्वाचित सदस्यांची पहिली ‘अग्निपरीक्षा’

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून आलेल्या नव्या कारभाऱ्यांसाठी बिबट्याचा प्रश्न ही पहिली आणि सर्वात मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. अनेक गावांतून तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी होत आहे. केवळ पिंजरे लावून प्रश्न सुटणार नाही, तर बिबट्यांचे नसबंदीकरण किंवा त्यांचे स्थलांतर यावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. वस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी नवीन निधीची तरतूद कशी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार; कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी

वनविभागाचे कर्मचारी सक्रिय

निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेले वनविभागाचे कर्मचारी आता पुन्हा एकदा फिल्डवर सक्रिय झाले आहेत. मात्र, बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे वनविभागाची यंत्रणा अपुरी पडताना दिसत आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पहिल्याच सभेत या विषयावर काय भूमिका घेणार यावर जुन्नरच्या ग्रामीण भागातील जनतेचे भवितव्य अवलंबून आहे.

निवडणुका येतात आणि जातात, पण बिबट्याचं संकट आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. नवीन नेत्यांनी आता एसी गाडीतून उतरून आमच्या बांधावर येऊन परिस्थिती पहावी. — एक त्रस्त शेतकरी, जुन्नर तालुका.

हे सुद्धा वाचा : कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी; राहू–खामगाव, खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव

Web Title: Leopards are spreading fear among citizens in junnar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Leopard
  • Leopard Attack
  • Leopard caught

संबंधित बातम्या

बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; ‘या’ परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर
1

बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; ‘या’ परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर

Leopard Captured : मर्सिडीज-बेंझ कंपनीतील बिबट्या अखेर जेरबंद; थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश
2

Leopard Captured : मर्सिडीज-बेंझ कंपनीतील बिबट्या अखेर जेरबंद; थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
3

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.