बायकोशी पंगा-गावभर दंगा! झोपलेल्या सिंहिणीला उठवणं जंगलाच्या राजाला पडलं महागात; पुढे जे घडलं ... मजेदार Video Viral
आपण सिंहाचे नाव ऐकताच आपल्या मनात एक प्राणी येतो जो निडर आणि धोकादायक असतो. सिंहाला जंगलातील सर्वात थरारक शिकारी आहे, जो आपल्या शिकारीसाठी कोणाचीही गयावया करत नाही. सिंहाची दहशत फक्त जंगलपूर्तीच मर्यादित नसून ती मानवी वस्तीतही तितकीच दिसून येते. आपल्या जिवाच्या संरक्षणासाठी प्राणी, पक्षी, मानव असे सर्वच सिंहापासून चार हाथ लांब असतात. हेच कारण आहे की त्याला जंगलाचा राजा म्हटलं जात. मात्र विचार करा या राजाचीच जेव्हा कुणासमोर हवा टाइट झाली तर ते दृश्य कसे दिसेल?
तुम्ही कधी ना कधी जोडप्यांना आपापसात भांडताना पाहिलं असेल, पण जंगलाचा राजा आणि राणी यांच्यातील भांडणाचे दृश्य तुम्ही क्वचितच पाहिलं असाव. सिंहीण ही वाघा इतकीच बलवान आणि हुशार असते, तिच्या वाटेल जाण सिंहालाशी महागात पडू शकते. असाच काहीसा प्रकार आजच्या या व्हायरल व्हिडिओत घडल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की पाहून थक्क व्हाल आणि तुमचे हसू अनावर होईल. सिंह-सिंहीणमधील मजेदार भांडणाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
बापरे! ॲनाकोंडासोबत आंघोळ करू लागली तरुणी, पाहून लोकं हादरली; घटनेचा थरारक Video Viral
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक सिंहीण आरामात झोपलेली दिसत आहे. याचवेळी, सिंह दबक्या पावलांनी मागून हळू हळू त्याच्याकडे जातो. सिंहाच्या आगमनाची जाणीव होताच ती ताबडतोब उठते आणि त्याच्यावर हल्ला करते. सुरुवातीला सिंह सामना करण्याच्या मूडमध्ये असतो परंतु लवकरच तो आपली हार मानतो आणि शांत होतो. यावरून नवरा कोणीही असूदेत बायकोसमोर त्याचे काहीही चालू शकत नाही हे स्पष्ट होताना दिसते. सिंहीणीचे हे भयानक रूप आणि त्याला घाबरणारा सिंह हे संपूर्ण दृश्य एक वेगळेच वळण घेते आणि अचानक हा व्हिडिओ हास्यास्पद बनतो.
— Nature Is Metal (@Naturelsmetall) December 20, 2022
हा व्हायरल व्हिडिओ @Naturelsmetall नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी पैज लावतो की ती म्हणाली हे खेळणे थांबवा हे मजेदार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझ्यासोबत असे रोज घडते…बायको कधीच मूडमध्ये नसते…”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.