
डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस त्याच्या शरीराभोवती गवताचा पेंढा गुंडाळलेला दिसतो. त्याने डोक्यापासून पायापर्यंत सर्व काही झाकले आहे. नंतर तो पेंढा पेटवतो आणि त्याची बाईकवर बसून राईडची मजा घेऊ लागतो. शिवाय, तो ज्वाला धगधगत असतानाही वेगाने बाईक चालवू लागतो. तुम्ही कदाचित याआधी शेकडो स्टंट पाहिले असतील, परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेले दृश्य कदाचितच कुणी याआधी पाहिले असावे. व्हायरल व्हिडिओमधील त्या माणसाच्या कृतीवरून स्पष्टपणे दिसून येते की तो व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी असे करत आहे. तथापि, प्रत्येकाने असा निष्काळजीपणा टाळला पाहिजे, कारण अशा घटनांमुळे जीवितहानी देखील होऊ शकते. व्हिडिओतील हा स्टंट अत्यंत धोकादायक असून आपला जीव धोक्यात घालून असे स्टंट करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.
रील ऐसी बनाओ कि 👇🏻👇🏻😂😂 pic.twitter.com/piG5RxwuwQ — तैमूर का जीजा 😎 🇮🇳 (@brijeshchaodhry) December 30, 2025
हा व्हिडिओ @brijeshchaodhry नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर ही आग वाढली तर भावाचा कबाब तयार होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रिल अशी बनवा की कुणी काॅपिच करु शकणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावाला जरा जास्तच थंडी वाजत असावी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.