
काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्... Video Viral
काय हा प्रकरण?
छिंदवाडा जिल्ह्यातील धानोरा चौकीतील नंदनवाडी गावातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस झाली आहे. शिक्षकाने आपली नोकरी जाईल या भीतीने आपल्या ३ दिवसांच्या चौथ्या बाळाला जिवंतपाणीच दगडांमध्ये गाढून टाकलं. स्थानिकांना मुलाच्या रडण्याचा आवाज येताच त्यांनाही घटनास्थळी धाव घेतली आणि दगड उचलताच त्यांना बाळाला तिथे पुरण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथील एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक आता बाळाच्या आई वडिलांवर योग्य ती कारवाई करण्यात येण्याची मागणी करत आहेत.
मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral
हा व्हिडिओ @pritamsinghnewsriporter24 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देव तारी त्याला कोण मारी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इतकं निर्दयी कोणी कसं होऊ शकत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कुणी इतक्या खालच्या पातळीवर, क्रूर कसं होऊ शकतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.