सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपण पाहतो. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहिल्यावर प्रश्न पडतो की खरेच असे घडू शकते का? तर अनेकदा हास्यास्पद व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर भांडणाचे, स्टंटचे, जुगाडाचे, डान्स रील्स तर सतत व्हायरल होताना दिसतात. याशिवाय अनेकदा सत्य घटनांचे थरारक व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात.
सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियवर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा देखील थरकाप उडेल. या व्हिडिओमध्ये काही लोक सुद्राच्या लाटेत वाहून जाताना दिसत आहेत. त्यामध्ये एक चिमुकला देखील आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना घाम फुटला आहे. मात्र अद्याप हा व्हिडिओ कुठला आहे हे कळालेले नाही .
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक समुद्रात खेळताना दिसत आहेत. त्यामध्ये काही महिला आणि एक चिमुकला देखील पाण्यात बसून खेळताना दिसत आहे. त्याच वेळी एक मोठी लाट येते आणि लोक वाहून जाऊ लागतात. अनेकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. तसेच तो चिमुकला देखील वाहून चाललेला असतो. मात्र एक माणूस येऊन त्याला वाचवतो. पण लाट सतत येत असतात. आणि चिमुकल्याला वाचवण्यासाठी गेलेला व्यक्तीचा देखील तोल जातो. पण आणखी दोन व्यक्ती त्या दोघांना वाचवायला जातात आणि त्यांचे प्राण वाचतात. हा व्हिडिओ पाहाताना तुमच्या अंगावर काटा येईल.
हे देखील वाचा – Viral Video: ती धावती ट्रेन पकडत होती अन् असे काही झाले की…; पाहा व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर mohit_rajasthan_churu या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्राया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मानवाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण, तर दुसऱ्या एका युजरने त्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्याला सलाम असे म्हटले आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे, लहान मुलांना अशा ठिकाणी घेऊन नाही गेले पाहिजे. तर चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ हा व्हिडिओ पाहाताना माझ्या अंगावर काटा आला होता, पालक इतके कसे निष्काळजी असू शकतात असे त्याने म्हटले आहे.
हे देखील वाचा- ‘मी पुन्हा येईन…’ कर्मचाऱ्याने राजीनामा देताना लिहिले असे काही की…; पाहून खळखळून हसाल