फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या पाहून मनात विचार येतो की खरेच असे घडू शकते का? तर अनेकदा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की आपले हसू आवरत नाही. आत्तापर्यंत तुम्ही डान्स, जुगाड, भांडण, स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. असे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेकदा हे व्हिडिओ इतके मनोरंजक असतात की, पाहून हसावे की रडावे कळत नाही.
सध्या अशीच एक मनोरंजक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून तुम्हाला 2019 च्या निवडणुकीची आठवण नक्की येईल. विशेषत: देवेंद्र फडवीसांच्या त्या वाक्याची, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण ही पोस्ट पाहून खळखळून हसत आहे. वास्तविक एका कर्मचाऱ्याने राजीनामा देताना असे काही लिहिले आहे की, ते पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
मी लवकरच परत येईन
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, कर्मचाऱ्याने रिझाईन लेटर लिहिले आहे. हे लेटर लिहिताना त्याने प्रामाणिकपणा दाखवला आहे. कर्मचाऱ्याने लिहिले आहे की, मी पुढील कारणामुळे रिझाईन करत आहे. त्याला एका नवीन कंपनीत नोकरी मिळाली आहे. मला एकदा तिथे जाऊन काम करायचे आहे. सध्या मी कंपनी सोडत आहे. पण काही गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मी नक्की परत येईन. असे म्हणून त्याने कंपनीचे आभार मानले आहेत. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रीया देखील देत आहेत.
व्हायरल पोस्ट
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
या पोस्टला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भावाने त्याचा बी प्लान आधीच तयार केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तो पुन्हा नियोक्ताकडे परत येईल हे सांगून खूप आनंद झाला. आणखी एका युजरने म्हटले आहे की, भाऊ केवढा प्रामाणिक आहे, तर चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, जर तुम्ही पुन्हा नोकरीवर आलात तर बॉस तुम्हाला कमी पगार देईल. अशा अनेक कमेंट या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @wallstreetoasis या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.