mahesh ahers plan to kill dr jitendra awhad and his family viral video clip stirs excitement in thane Read in detail nrvb
ठाणे : डॉ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला (Dr Jitendra Awhad And His Family) संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर (Gangster Babaji alias Subhash Singh Thakur) याच्या मदतीने शूटर तैनात केले (Shooter deployed) असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर (TMC Officer Mahesh Aher) यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे (Audio Clip Viral). या ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे.
ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी डॉ.जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे.
[read_also content=”मध्यरात्रीच्या सुमारास नवीन जालन्यातील दोन दुकानांना भीषण आग; झालंय ‘एवढ्या’ लाखांचं नुकसान, आग नियंत्रणात https://www.navarashtra.com/maharashtra/two-shops-in-new-jalna-caught-fire-around-midnight-loss-of-lakhs-of-rupees-fire-is-under-control-nrvb-369943.html”]
या संभाषणात, ” माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं तेव्हा रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असं मी क्रिएट करून ठेवले आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पटवून ठेवलं आहे. आव्हाड माझं केव्हाही काही करू शकतो. असं मी क्रिएट करून ठेवलं आहे. बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नातशाचा पत्ता शोधला आहे. त्याचा जावई ठाण्यात नाही आला. तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावली. तो असा नाही आला ना त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे. स्पेन एवढं मोठं नाही. त्याचा विकास कॉम्प्लेक्स पत्ता आहे त्याच्या आई वडिलांच्या सोबत एक कांड केला. तर तो आई बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. त्याचा गेम करणार त्याच्या मुलीला रडायला लावणार, म्हणजे त्याला कळणार मुलीचं दुःख काय असतं? प्लॅनिंग केलं आहे. तो साप आहे. मी सर्व प्लॅन केला आहे. त्याला देखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो. आपली फॅमिली उध्वस्त होऊ शकते. मुलीला काहीही होऊ शकते. तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो तेव्हा तो शांत होईल. मला ठेचायचा आहे. माझ्या माणसाला विचारा सुटकेस भरून बाबाजीकडून पैसे येतात. बाबाजी माझ्यासाठी लीगल प्रोपार्टीसाठी काम करतो,” असे महेश आहेर याने या संभाषणात म्हटले आहे.
[read_also content=”Breaking : तुर्भे येथील कापड गोदामाला लागली भीषण आग; मालाचे लाखोंचे नुकसान; आतील कामगार वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली https://www.navarashtra.com/maharashtra/breaking-news-a-raging-fire-broke-out-at-a-textile-godown-in-turbhe-navi-mumbai-millions-in-damage-to-goods-as-the-workers-inside-got-out-in-time-the-no-loss-of-life-nrvb-369933.html”]
दरम्यान, अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलीस तक्रारही करणार नाही. कारण, पोलीस काय करणार नाहीत, हे आपणांस माहित आहे, असे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.