आराराsss खतरनाक! व्यक्तीने मगरीचे तुकडे केले अन् दुसऱ्या मगरींना खाऊ घातले, थरारक दृश्यांनी युजर्स हादरले; Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील. इथे व्हायरल होण्यासाठी लोक नको ते करायलाही मागेपुढे बघत नाहीत. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इथे अनेक विचित्र आणि साहसाने भरलेले व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. इंटरनेटवरील हे व्हायरल व्हिडिओ कोणता नवीन प्रकार आपल्या डोळ्यासमोर आणून उभा करतील याचा काही नेम नाही. अशातच इथे आता आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्यांचा तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही. यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर प्राण्यांसंबंधित अनेक नवनवीन व्हिडिओज शेअर केले जातात. आताही असेच काहीसे घडले आहे मात्र यातील दृश्ये थरारकतेने भरलेली आहेत. पाण्याचा राक्षस म्हणून मगरीची ओळख आहे अशात सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती याच मगरीला निर्दयपणे कापताना दिसून आला. तो इथेच थांबत नाही तर चाकूने मगरीचे तुकडे करत समोर बसलेल्या इतर मगरींना हे मांस खायला घालतो. हे भयानक दृश्य कुणालाही घाबरवेल असेच आहे. व्हिडिओतील हे दृश्य पाहून लोक हादरले आहेत तर काही, व्यक्तीने अन्न वाया घालू नये जास्तच मनावर घेतल्याचे दिसून आहे अशी टिपणी व्हिडिओवर केली आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @sm_ka09_mysore नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत तर काही युजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हो, माणसांचे आणि प्राण्यांचे शरीरही वाया घालवू नका…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एकमेकांना कापून खायला घालत आहे याचा काय फायदा”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “राजकारणी नेमके असेच काम करतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.