असा जुगाड होणे नाही! लाईट बिल वाचवण्याची पठ्ठ्याने लढवली अनोखी शक्कल... एकाच AC पासून मिळणार दोन खोल्यांना थंडावा; Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याच अशा गोष्टी शेअर केल्या जातात ज्या आपल्या कल्पनेपलीकडच्या ठरतात. लोक व्हायरल होण्यासाठी अनेक नको नको त्या गोष्टी करतात. कधी कोणी स्टंट करू पाहतं तर कधी कोणी जुगाड शेअर करतं. अशातच आता आणखीन एक नवीन जुगाड सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे ज्यात एका व्यक्तीने एसीचं बिल वाचवण्यासाठी एक असा जुगाड केला की पाहून सर्वांचेच डोळे खुलेच्या खुले राहिले. व्यक्तीचा हा जुगाड आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून चला व्हिडिओत नक्की काय दिसून आलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात खोलीतील दृश्य दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसून येत आहे जो एक फळी फिरवतो आणि यावर एसी चिपकवल्याचे आपल्याला दिसून येते. खरंतर व्यक्तीने ही फळी दोन खोल्यांच्या मधोमध अशाप्रकारे चिपकवलेली असते की तिला फिरवताच एसी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरवता जाते आणि याने फायदा असा होतो की आपल्याला हवं तेव्हा हव्या त्या खोलीत आपण एकाच एसीतून दोन खोल्यांमध्ये थंड हवेची मजा घेऊ शकतो. काहीही बोला व्यक्तीचा हा जुगाड आहे तर मजेदार… बिल वाचवण्यासाठी त्याने लढवलेली ही शक्कल आता अनेक युजर्सना चांगलीच पसंत पडली असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
हा मजेदार जुगाड @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ‘Technologia! पैसे वाचवण्याचा A1 जुगाड; एकाच AC पासून दोन खोल्यांना थंडावा’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोक कधी काय करतील याचा नेम नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने बिलाचं जरा जास्तीच मनावर घेतलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्यक्तीच्या जुगाडाला सलाम”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.