(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलातील जग हे मानवाच्या जगाहून फार वेगळे आहे. इथे अनेक अशा घटना घडतात ज्याची मानवाला कल्पना नाही. इथे एकच्या उदर्निर्वाहासाठी दुसऱ्याचा बळी जाणे हे अटळ आहे. यामुळेच जंगल फार क्रूर आहे अशा अनेक उपमा जंगलाला दिल्या जातात. आपण जंगलापासून आणि तेथील आयुष्यापासून फार दूर असलो तरी सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला संपूर्ण जग फिरवत असते. कुठे, कधी, नेमकी कोणती घटना घडली या सर्व गोष्टी आपल्याला सोशल मीडियाच्या मदतीने घरबसल्या पाहायला मिळतात. इथे जंगातील देखील अनेक दृश्ये शेअर केले जातात जे लोक आवडीने बघतात आणि आता देखील इथे अशीच एक घटना जोरदार व्हायरल झाली आहे जी इंटरनेटवर सर्व युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
आजकालचं जग हे नात्यांवर नाही तर सत्येवर अवलंबून आहे. ज्याच्याकडे सत्ता आणि पैसे हे जग त्याचे… अशात आपण जमिनीसाठी किंवा सत्तेसाठी भावाभावांमध्ये, बाप-लोकांमध्ये झालेले वाद, भांडण पाहिली आहेत. मानवाच्या याच लालची वृत्तीमुळे त्याला नात्यांचा विसर पडला असून ‘माणसांपेक्षा ते प्राणी बरे’ हे वाक्य तुम्ही अनेकदा थोरामोठ्यांचा तोंडात ऐकले असतील मात्र काय होईल जेव्हा तुम्हाला समजेल की, भावकीचा हा वाद फक्त मानवांपुरताच मर्यादित नाही तर प्राण्यांमध्येही यावरून वाद होत असतात. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात सिंहाचं एक संपूर्ण कुटुंब दुसऱ्या सिंहांसोबत लढताना दिसून येत आहेत. सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते अशात जंगलावर नक्की कोण राज्य करणार आणि हे साम्राज्य नक्की कुणाच्या हाती येणार यावरून हा वाद सुरु असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
व्हिडिओमध्ये फक्त सिंहच नाही तर त्याची पत्नी सिंहीण देखील रौद्र अवतारात इतर सिंहांवर हल्ला करताना दिसून येते. यावेळी त्यांचे बछडे देखील तेथे उपस्थित असतात आणि हा संपूर्ण प्रकार एका कौटुंबिक वादाचे दृश्य प्रतिबिंबित करते. कारण काहीही असो पण सिंहांमध्ये आपआपसात रंगणारा हा वाद आता सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान सिंहाच्या कौटुंबिक वादाचा हा व्हिडिओ @karla_tours_and_travel नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून एका युजरने लिहिले आहे, “कदाचित त्याने जास्त जागा घेतली असेल म्हणून वाद झाला असावा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फॅमिली ड्रामा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.