Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मस्ती मस्ती जीवाचा झाला खेळ! व्हिडिओ शूट करतानाच गोळी झाडली अन् क्षणात जे घडलं… घटनेचा थरारक Video Viral

Man Shoots Himself Video : दिल्लीतील धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. रील शूट करता करता पिस्तुलातून गोळी सुटली अन् थेट व्यक्तीच्या छातीत रुतली. व्यक्तीच्या मृत्यूचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला जातोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 18, 2026 | 10:44 AM
मस्ती मस्ती जीवाचा झाला खेळ! व्हिडिओ शूट करतानाच गोळी झाडली अन् क्षणात जे घडलं... घटनेचा थरारक Video Viral

मस्ती मस्ती जीवाचा झाला खेळ! व्हिडिओ शूट करतानाच गोळी झाडली अन् क्षणात जे घडलं... घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील दल्लूपुरा गावात रिल बनवताना पिस्तूलातून चुकून गोळी सुटल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
  • व्हिडिओ शूट करताना त्याने चुलत भावाचे पिस्तूल हातात घेतले आणि अपघात घडला.
  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत.
दिल्लीतील दल्लूपुरा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याच्या व्हिडिओने संपूर्ण इंटरनेटवर धुमाकूळ माजवला. रिलच्या क्रेझसाठी लोक बऱ्याचदा आपला जीव धोक्यात घालून स्टंट करु पाहतात आणि याचाच परिणाम व्यक्तीला स्वत:च्या मृत्यूने भोगावा लागला. व्हिडिओ काढत व्यक्तीने हातात पिस्तूल धरली आणि मस्ती मस्तीत पिस्तुलातून गोळी सुटल्याने व्यक्ती जागीच जमिनीदोस्त झाला. या घटनेनंतर मित्राने त्याला तातडीने रुग्णालयात नेलं खरं पण तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. चला या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

व्यक्तीच्या एका चुकीने घराला बनवलं कबुतरखाना, 3 वर्षांनंतर घरी येऊन पाहतो तर… Video Viral

काय आहे प्रकरण?

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर व्यक्तीचा मृतदेह कुटुबियांच्या ताब्यात दिला. घटनेविषयी माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मृत २८ वर्षीय पवन कुमार हा दल्लूपुरा गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. पोलिसांनी न्यू अशोक नगर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृताच्या चुलत भावाकडून १० काडतुसे आणि एक पिस्तूल जप्त केल्या आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ मंगळवार सकाळपासून सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण स्वतःवर गोळी झाडताना दिसतो ज्यानंतर तो जमिनीवर पडतो.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही घटना दल्लूपुरा गावात घडली, जिथे पवन त्याचा चुलत भाऊ हिमांशूसोबत होता. ते दोघे त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ शूट करत असताना पवनने हिमांशूचे परवानाधारक पिस्तूल घेतले. चित्रीकरण करत असताना, पिस्तुलातून अचानक गोळी सुटली आणि ती पवनच्या छातीत लागली. या घटनेनंतर, हिमांशूने जखमी पवनला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली. हिमांशूचा मोबाईल फोन, ज्यामध्ये घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, तोही जप्त करण्यात आला. हा निव्वळ अपघात होता की त्यामागे इतर काही कारणे होती, हे निश्चित करण्यासाठी पोलीस घटनेच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत. तपासानंतरच घटनेचे सत्य समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

वरमाळा घालतायत की थर लावतायत? लग्नातील ‘या’ अतरंगी नवरा-नवरीची एन्ट्री पाहून Video व्हायरल; नेटकरी म्हणाले…

मंगळवार सकाळपासून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये पवन व्हिडिओ शूट करताना आचानक त्याच्या पिस्तूलातून गोळा त्याच्या छातीला लागल्याचे दिसून येते ज्यानंतर तो जमिनीवर पडतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियासाठी व्हिडिओ शूट करताना कोणत्याही प्रकारचे शस्त्र वापरू नये, कारण थोडासा निष्काळजीपणा देखील जीवघेणा ठरू शकतो.

Web Title: Man mistakenly shoot himself while making video in delhi viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • delhi
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.