
व्यक्तीने 1,86,000 रुपयांचा स्मार्टफोन ऑनलाईन ऑर्डर केला, पण बॉक्स उघडताच अशी गोष्ट बाहेर आली... Video Viral
मेहनत आणि वेळ वाचवण्यासाठी आजकाल अधिकतर लोक ऑनलाईन गोष्टी ऑर्डर करतात. यात पैसे आधीच दिले जातात. वस्तू व्यवस्थित आपल्याकडे डिलिव्हर झाली आहे किंवा त्यात काही फाॅल्ट असल्यास ते दाखवण्यासाठी वस्तू डिलिव्हर होताच ओपनिंगचा व्हिडिओ तयार केला जातो. Amazon ही एक विश्वासार्ह ई-कॉमर्स वेब साईट आहे. इथे कपड्यांपासून इलेक्ट्रीक वस्तूंपर्यंत सर्वच काही ऑनलाईन ऑर्डर करता येतं. पण नुकताच या प्लॅटफाॅर्मवरुन झालेला घोटाळा समोर आला आहे ज्यात व्यक्तीने महागडा स्मार्टफोन ऑर्डर करताच त्याली भलतीच गोष्ट डिलिव्हर झाली. मुख्य म्हणजे, याचे पेमेंट त्याने आधीच केले होते. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
वास्तविक ऑनलाईन ऑर्डरमध्ये घोटाळा होण्याची शक्यता फारशी नसते पण काही क्वचित काही वेळा अशा घटना घडून येतात. इंटरनेटवर व्हायरल होत असलेली ही घटना बंगळूरमधील आहे. इथे एका इंजिनीयरने आपल्यासाठी तब्बल 1 लाख 87 हजारांचा स्मार्टफोन ऑनलाईन Amazon वर ऑर्डर केला, याचे पैसे त्याने ऑनलाईन पेमेंट मेथडने आाधीच दिले होते. काही दिवसांनी त्याची ही ऑर्डर डिलीव्हर झाली खरी पण याता अनबाॅक्सिंग व्हिडिओ बनवताना यातून फोन नाही तर वेगळीच गोष्ट बाहेर पडताना दिसून आली. व्हिडिओमध्ये, ग्राहक महागडा फोन अनपॉक करायला सुरुवात करतो. पण बाॅक्स उघडताच यातून फोनऐवजी एक काचेची टाईल्स बाहेर पडते. व्यक्तीसोबत झालेला हा घोटाळा पाहून आता सर्व यूजर्स हादरुन गेले आहेत. ऑनलाईन शॉपिंग कितीही मजेदार आणि सोईची असली तरी त्याची कुरुप बाजू या घटनेतून आपल्या समोर येते.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकाने Samsung Galaxy Fold 7, 1 लाख 87 हजार रुपयांना ऑर्डर केला होता. या घोटाळ्याविरोधात FIR दाखल करण्यात आली असून Amazon ने ग्राहकाला त्याचे पैसे परत केले आहेत. हा व्हिडिओ आपल्यासाठी एक धडा आहे की ऑनलाईन कोणतीही वस्तू ऑर्डर करताना त्याची विश्वसार्हता चेक करावी आणि कोणतेही पार्सल ओपन करण्याआधी त्याचा ओपनिंग व्हिडिओ नेहमी तयार करावा.
Bengaluru Techie orders a smart phone from @amazonIN gets a stone tile instead. FIR registered. The Samsung Galaxy Fold 7 cost him 186,999. He recorded the unboxing on video, amazon has issued a refund, but cops continue probe. pic.twitter.com/KDMONtqfHJ — Deepak Bopanna (@dpkBopanna) October 30, 2025
रस्त्यावर जुंपली मुलींची WWE फाईट, धक्का देताच तरुणी गेली जमिनीखाली… भयंकर हाणामारीचा Video Viral
हा व्हायरल @dpkBopanna नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.2 मिलियनहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून लाखो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही थेट किरकोळ दुकानांमधून महागडे गॅझेट खरेदी करावे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला माहित नाही, पण अनबॉक्सिंगनंतर टाइल दिसल्यावर मी कदाचित इतका सौम्य राहणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजकाल सगळेच फोनची ओपन बॉक्स डिलिव्हरी करतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.