भाई के टूथ पेस्ट में थोडा ज्यादा नमक था! व्यक्तीने आपल्या दातांनी ओढली 279 टन वजनाची ट्रेन, गिनीज वर्ल्ड बुकने शेअर केला Video
प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण असतात असे म्हटले जाते. मात्र आपल्या मजबूत कलेच्या जोरावर व्यक्तीने असा पराक्रम करून दाखवला की त्याचे नाव थेट गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवण्यात आले. मानवी शरीराच्या ताकदी आणि इच्छाशक्तीसमोर काहीही अशक्य नाही. इजिप्तच्या अशरफ मोहम्मद सुलेमान यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा हा पराक्रम तुमचे डोळे खुलेच्या खुले करेल. आता त्यांनी नक्की असं काय केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
वास्तविक, अशरफ यांनी २७९ टन वजनाची ट्रेन दातांनी ओढून काढली आहे, ज्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. हे पराक्रम केवळ आश्चर्यकारकच नाही तर मानवी क्षमतेचे एक असाधारण प्रदर्शन देखील आहे. हा विक्रम करत असताना त्यांनी आपल्या दातांनी दोरी धरली आणि काही मीटर ट्रेन ओढत काढली. “दातांनी सर्वात जड ट्रेन ओढणे” या श्रेणीत हा विक्रम गिनीज बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला गिनीजचे अधिकारी आणि शेकडो प्रेक्षक उपस्थित होते, ज्यांनी हे अशक्य वाटणारे पराक्रम स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले.
या विक्रमामागे अशरफची वर्षानुवर्षे केलेली मेहनत आणि कठोर प्रशिक्षण होते. त्याने त्याच्या शरीराला, विशेषतः जबड्याच्या आणि मानेच्या स्नायूंना, इतके जड वजन सहन करण्यास प्रशिक्षित केले. शिवाय, त्याच्या मानसिक कणखरपणा आणि आत्मविश्वासामुळे हे यश शक्य झाले. अशरफ म्हणतात की हे केवळ शारीरिक ताकदीचेच नाही तर मानसिक ताकदीचाही परिणाम आहे. त्यांच्या या विक्रमाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ज्याला स्वतः गिनीज वर्ल्ड बुकने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे.
व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून बऱ्याच लोकांनी कमेंट्समध्ये या रिकॉर्डवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “यामुळे त्याचे दात खराब झाले का? ते खरोखर धोकादायक वाटते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक दंतचिकित्सक म्हणून.. त्याच्या पिरियडोंटल लिगामेंटला सलाम, त्याच्या जबड्याचे एक्स-रे पहायला आवडतील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.