(फोटो सौजन्य – X)
सोशल मेडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी भावुक करतात तर कधी थक्क करून जातात. इथे तुम्हाला अनेक निराळ्या गोष्टी पहिल्या जास्तीत ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. सध्या मात्र इथे एका लग्नसमारंभातील गोड व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यातील नवरीचा डान्स पाहून सर्वच घायाळ झाले. नवरीच्या नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवत असा डान्स केला की नवरा मुलगाही लाजू लागला. चला व्हिडीओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर सध्या एका लग्नसमारंभातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात नवरा आणि नवरी नाचताना दिसत आहेत मात्र यातील नवरीच्या ठुमक्यांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवत तिने ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. तिचे एक्सप्रेशन्स आणि नाच इतका जबरदस्त होता की नवरा मुलगाच काय तर पाहुण्यांच्याही नजरा तिच्याकडे खिळून राहिल्या. नवरीच्या हा डान्स आता नेटकऱ्यांना भारीच आवडला असून लोक आता हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत. व्हिडिओतील सर्वात विशेष बाब म्हणजे, आपण अधिकतर मुलींना लाजताना पाहतो पण यात नवरीचा डान्स पाहून नवरा मुलगा लाजताना दिसून आला त्यानंतर नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
bhAAi songs antene ahh acceptance ahh vibe ochesthaadhi 🤩❤️🤌@alluarjun #Pushpa2TheRule pic.twitter.com/DOzh4L8ltw
— Allu Babloo AADHF (@allubabloo) January 19, 2025
हा व्हिडिओ नक्की कुठला आणि कधीच याची अधिकृती माहिती तर अद्याप हाती आली नाही मात्र सोशल मीडियावर याने जबरदस्त धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ @allubabloo नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अद्भुत ऊर्जा.. उत्तम जोडपे! त्यांना कायम आनंदाची शुभेच्छा!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जोडीदार मनासारखा मिळण्याचा हा आनंद” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नक्कीच सासर गाजवणार”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.