एका भक्ष्यामागे लागले अनेक शिकारी, खाण्याची वाटणी सुरूच होती तितक्यात सिंहाने बदलला खेळ; शिकारीचे थरारक दृश्ये अन् Video Viral
जंगलात शिकारीचे अनेक दृश्य नजरेस पडत असतात याचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात जे नेहमीच व्हायरल होतात. लोकांना शिकारीचे हे दृश्य व्हिडिओतून का होईना पण जवळून पाहायला फार आवडते. यातून जंगलाचे आणि निसर्गाचे नाते आणखीन जवळून ओळखता येते. जंगलात प्रत्येक शिकारी भक्ष्याच्या शोधात असतो आणि एकदा एका त्यांच्या नजरेस कोणी लागला की मग संपूर्ण बळ एकवटून ते त्याच्यवर हल्ला चढवतात. भक्ष्याची हार आणि शिकाऱ्याच्या विजय हे दृश्य तर आपण अनेकदा पाहिले आहे पण शिकाऱ्यावर दुसऱ्या शिकाऱ्याने केलेला हल्ला तुम्ही कधी पाहिला आहे का? थरारकतेने भरलेले हे दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
काय दिसलं व्हिडिओत ?
व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या हरणाची शिकार करतो आणि त्याला एका झाडाजवळ आणतो. पण त्याच दरम्यान जंगली कुत्र्यांचा एक कळप तिथे येतो. संपूर्ण कळपाला पाहून बिबट्या घाबरतो आणि आपली शिकार तिथेच सोडून देतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर चढतो. आता संधी मिळताच, हरीण तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु जंगली कुत्रे त्याला पकडतात. दरम्यान, अचानक तरस तिथे पोहोचतात, जे पाहून जंगली कुत्र्यांची अवस्था बिकट होते. मग काय होते, तरस हरणावर हल्ला करतात आणि शिकार मारतात, फक्त हाडे उरतात. पण खेळ इथेच संपत नाही कारण काहीच वेळात आपण तिथे सिंहाची जबरदस्त एंट्री होताना पाहतो.
गुपचूप आलेला हा सिंह आपली संपूर्ण शक्ती एकवटून एका तरसावर हल्ला चढवतो, त्याचा हल्ला पाहून बाकी सर्वच घाबरतात आणि तिथून आपला पळ काढतात. सिंह मात्र आपली पकड घट्ट करत तरसाचा फडशा पडतो आणि हे संपूर्ण दृश्य जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांच्या कॅमेरात कैद होते. एका भक्ष्यामागे शिकाऱ्यांची सुरु असलेली ही रंगत आणि मजेदार, साहसाने आणि अनेक ट्विस्टने भरलेली लढत पाहून आता युजर्स थक्क झाले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.
— PREDATOR VIDS (@Predatorvids) September 15, 2025
शिकारीचा हा व्हिडिओ @Predatorvids नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे दोन वेगवेगळे व्हिडिओज आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते क्रूर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जंगलाचे आयुष्य भयानक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.