(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलाचं जग हे मानवाच्या जगातून फार वेगळं असतं. इथे जगण्यासाठी शिकार ही करावीच लागते आणि रोज मोठे शिकारी कमकुवत आणि लहान प्राण्यांना आपली शिकार बनवत असतात. अशातच नुकताच एका शिकारीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात जंगलाचा राजा म्हणजेच सिंह आणि जंगलाची राणी म्हणजेच सिंहिणीने मिळून एका छोट्या हत्तीवर हल्ला चढवल्याचे दृश्य दिसून येते. जंगलात सिंहाची दहशत फार असते, आपल्या एका डरकाळीने तो भल्याभल्यांना मृत्यूच्या घरी पोहचवतो अशात त्याच्या तोंडातून शिकार सोडवणे जरा कठीणच आहे पण व्हिडिओत हत्तीच्या आईने ते करून दाखवले आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सिंहाची भिडते आणि आपल्या मुलाला सुखरूप त्याच्या तावडीतून वाचवून आणते. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
AC ट्रेनमध्ये तरुणीचा ‘सिगारेट’ ड्रामा; विरोध करणाऱ्या प्रवाशाला धमकी, Video व्हायरल
काय घडलं व्हिडिओत?
जगातील कोणत्या बलाढ्य योद्धा आईसमोर टिकू शकत नाही. आपलं बाळ जेव्हा संकटात असतं तेव्हा त्याला वाचवण्यासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते. मृत्यूच्या तोंडातून आपल्या मुलाला वाचवण्याची शक्ती आईत असते आणि असेच काहीसे व्हिडिओत घडताना दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की एक सिंहीण एका हत्तीच्या बाळाला पकडून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करते. एक सिंहही तिथे फिरत असतो. पण मादी हत्ती तिथे पोहोचताच परिस्थिती बदलते. मादी हत्तीला पाहून सिंहीण घाबरते आणि लगेच शिकार सोडून पळून जाते. आईचा तो रौद्रावतार पाहून सिंह देखील घाबरतो आणि लगेच माघार घेतो. अशा प्रकारे आई तिच्या बाळाचा जीव वाचवते. जंगलातील हे दृश्य आता इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत असून लोक हत्तीणीच्या हिमतीची प्रशंसा करत आहे. हा व्हिडिओ प्राण्यांमध्येही आई मुलाचे नाते किती घट्ट असते ते सांगून जातो…
हा व्हायरल व्हिडिओ @wildfriends_africa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिचा आवाज… तिच्या बाळासाठी राग, काळजी, भीती आणि वेदनांनी भरलेला. माझ्या डोळ्यात पाणी आले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शाब्बास आई, तुमच्या बाळाचे रक्षण करताना निर्भय राहा, आशीर्वाद?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शाब्बास आई, तू तुझ्या बाळाचे रक्षण करत आहेस”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.