Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवढं ते प्रेम! पाळीव कुत्र्याच्या वाढदिवसाला 11 किलोचा केक, पाहुण्यांना रिटर्न गिफ्टमध्ये रेफ्रिजरेटर दिला भेट

मेरठचे डॉ. शमीम अहमद हे ट्रान्सलाम कॉलेजमध्ये फार्मसी विभागात प्राध्यापक आहेत. शमीम अहमद यांच्याकडे अॅलेक्स नावाचा सेंट बर्नार्ड जातीचा पाळीव कुत्रा आहे. यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचा तिसरा वाढदिवस साजरा केला

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 06, 2023 | 11:35 AM
केवढं ते प्रेम! पाळीव कुत्र्याच्या वाढदिवसाला 11 किलोचा केक, पाहुण्यांना रिटर्न गिफ्टमध्ये रेफ्रिजरेटर दिला भेट
Follow Us
Close
Follow Us:

आपल्या प्रियजनांचा वाढदिवस (Birthday) सगळ्यात खास व्हावा यासाठी सगळेजण वेगवेगळ्या कृप्त्या लढवत असतात. काहीजण तर आपल्या पाळीव प्राण्याचांही वाढदिवस साजरा करताना हजारो रुपये खर्च करतात. सध्या सोशल मिडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video)होताना दिसत आहे. यामध्ये एका व्यक्ति त्याच्या कुत्र्याचा वाढदिवस (Dog Birthday Party) साजरा करताना दिसत आहे. या कुत्र्याच्या वाढदिवसाला तब्बस 11 किलोंचा केक (Cake) कापण्यात आला. एव्डढचं नव्हे तर पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट मध्ये महागड्या वस्तूही देण्यात आल्या.

कुठं साजरा झाला वाढदिवस

कुत्र्याचा हा अजब गजब वाढदिवस हा मेरठ पार पडला. मेरठचे डॉ. शमीम अहमद हे ट्रान्सलाम कॉलेजमध्ये फार्मसी विभागात प्राध्यापक आहेत. शमीम अहमद यांच्याकडे अॅलेक्स नावाचा सेंट बर्नार्ड जातीचा पाळीव कुत्रा आहे. यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचा तिसरा वाढदिवस साजरा केला. यावेळी शमीम अहमद यांनी 300 हून अधिक लोकांना आमंत्रित केले होते. त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या वाढदिवस अगदी थाटामाटात केला. त्यांनी निमंत्रणाचा व्हिडिओ बनवून सर्व निमंत्रितांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. तसेच, या पार्टीत लकी ड्रॉ जिंकणाऱ्या पाहुण्याला त्याने रेफ्रिजरेटरही भेट म्हणून दिले. डॉ शमीम अहमद हे प्राण्यांवरच्या प्रेमासाठी स्थानिक पातळीवर ओळखले जातात.

वाढदिवसाला कापला 11 किलोचा केक

या पार्टीत, 11 किलोचा केक कुत्र्याच्या उपस्थितीत कापण्यात आला, ज्याला सर्व आमंत्रितांनी शुभेच्छा दिल्या होत्या. डॉ शमीम अहमद यांचे नातेवाईक आणि परदेशात राहणारे त्यांचे विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या वाढदिवसाच्या पार्टीत सामील झाले होते. या पार्टीला उपस्थित लहान मुले आणि मोठ्यांनी खूप मजा केली. या प्रसंगी स्वादिष्ट मेनूमध्ये छोला भटुरा, आईस्क्रीम, विविध चाट पदार्थ आणि चायनिज पदार्थांचा समावेश होता यावेळी शमीम अहमद यांचा दुसरा पाळीव कुत्रा रिम देखील पार्टीत सामील झाला होता. दरम्यान, सकाळी डॉ. अहमद यांनी स्वत: रस्त्यावरील निराधार जनावरे, गायी, कुत्रे, माकडे यांना अन्न दिले.

Web Title: Meerut college professor shamim ahmed celebrates the birthday of his pet dog gifts a refrigerator to a guest nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2023 | 11:35 AM

Topics:  

  • Meerut

संबंधित बातम्या

हे मंदिर चक्क रात्रभर भूतांनी बांधले, भोलेनाथच्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते; मंदिर आहे तरी कुठे?
1

हे मंदिर चक्क रात्रभर भूतांनी बांधले, भोलेनाथच्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते; मंदिर आहे तरी कुठे?

भारतातील अतिशय अनोखी घटना! पोटात नाही तर महिलेच्या लिव्हरमध्ये दिसलं बाळ; अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले
2

भारतातील अतिशय अनोखी घटना! पोटात नाही तर महिलेच्या लिव्हरमध्ये दिसलं बाळ; अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.