(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
माहितीनुसार, हा व्हिडिओ चीन येथून समोर येत आहे. व्हिडिओमध्ये, एक मांजर आपल्या पिल्लांपर्यंत पोहोचण्यासाठी एक उंच विटांच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसते. भिंत फार उंच असल्याने तिला भिंत चढण्यात फार त्रास होत असतो. मांजर अनेकदा भिंतीवर चढते, काहीसा घसरुन खाली पडते पण तरीही आपली जिद्द ती हरत नाही. बाळाच्या भेटीसाठी हिरकणीने ज्याप्रकारे रायगडावरील कडा उतरला, अगदी त्याचप्रमाणे मांजरही आपल्या पिल्लाच्या भेटीसाठी भिंतीवर चढताना दिसते. तिची धडपड पाहून तिथे उपस्थित लोकही मांजरीची मदत करण्यासाठी जवळ येतात.
व्हिडिओमध्ये, मांजर पूर्ण ताकदीने भिंत चढताना दिसत आहे. अनेकदा ती भिंतीवर चढते पण हलक्याश्या फरकाने तिचा तोल ढालळतो आणि ती खाली पडते. असे असूनही, ती हार मानत नाही आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करु लागते. खाली उभे असलेले काही लोक तिला इजा होऊ नये म्हणून एक मोठे ब्लँकेट धरून ठेवतात जेणेकरुन ती खाली पडलीच तर त्या ब्लँकेटवर पडेल. मांजरीचा हा प्रयत्न अखेर यशस्वी झाला की नाही तिची तिच्या पिल्लासोबतची भेट तर व्हिडिओत दाखवण्यात आली नाही पण व्हिडिओतील तिची धडपड पाहून यूजर्सचे डोळे भरुन आले आहेत.
बिल्ली अपने बच्चों तक पहुँचने के लिए ऊँची दीवार पर चढ़ गई। एक दिल दहला देने वाला सीन वायरल हो गया है, जिसमें एक बिल्ली बार-बार गिरती रही। फिर भी वह दूसरी तरफ अपने बच्चों तक पहुँचने के लिए ऊँची ईंट की दीवार पर चढ़ने की कोशिश करती रही। राहगीर नीचे एक बड़ा कंबल पकड़े खड़े थे और… pic.twitter.com/A7rOGwXZJM — Sidd (@SirAbdullahSidd) August 6, 2026
शेवटी आईच असते जी आपला जीव धोक्यात घालून मुलाचे रक्षण करते. याचे जिवंत उदाहरण आपल्याला आताच्या व्हिडिओतही पाहायला मिळेल. हा व्हिडिओ @SirAbdullahSidd नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ६६ लाखाहून अधिकचे व्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “आई मुलासाठी योद्धाच असते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आईचं प्रेम असं असतं की ती आपल्या मुलासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आपल्या ध्येयाच्या जवळ जाऊन ती अपयशी ठरत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






