Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

आईच्या मायेपुढे कोणतीही अडचण मोठी नसते. पिल्लाला भेटण्यासाठी एका आई मांजरीने केलेली जीवाची धडपड पाहून यूजर्स भावूक झाले. व्हिडिओ चीनमधून समोर येत असून यातील दृष्यांनी यूजर्सना भावूक केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2026 | 03:25 PM
शेवटी आईच ती...! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

शेवटी आईच ती...! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

Follow Us
Follow Us:
  • पिल्लांना भेटण्यासाठी आई मांजरीने उंच भिंत चढण्याचा वारंवार प्रयत्न केला.
  • अनेकदा खाली पडूनही तिने हार मानली नाही; उपस्थित लोकांनीही तिची मदत केली.
  • आईच्या मायेचा हा भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोकांची मने जिंकत आहे.
असं म्हणतात या जगात आई इतकं निस्वार्थी प्रेम कुणीही करु शकत नाही. जन्मापासून मुलाची आईसोबत नाळ जोडली जाते. मुलाला साधं खरचटलं तरी पहिली आईच असते जिचा जीव तिच्या मुलाच्या काळजीसाठी कासाविस होतो. मुलावर कोणते संकट जरी ओढवले तरी आईच असते जी सर्व संकटांमधून मुलाला सुखरुप बाहेर काढते. आईचे हे प्रेम फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळते. अलिकडे यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून व्हिडिओतील दृष्यांनी यूजर्सना भावूक केलं आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माहितीनुसार, हा व्हिडिओ चीन येथून समोर येत आहे. व्हिडिओमध्ये, एक मांजर आपल्या पिल्लांपर्यंत पोहोचण्यासाठी एक उंच विटांच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसते. भिंत फार उंच असल्याने तिला भिंत चढण्यात फार त्रास होत असतो. मांजर अनेकदा भिंतीवर चढते, काहीसा घसरुन खाली पडते पण तरीही आपली जिद्द ती हरत नाही. बाळाच्या भेटीसाठी हिरकणीने ज्याप्रकारे रायगडावरील कडा उतरला, अगदी त्याचप्रमाणे मांजरही आपल्या पिल्लाच्या भेटीसाठी भिंतीवर चढताना दिसते. तिची धडपड पाहून तिथे उपस्थित लोकही मांजरीची मदत करण्यासाठी जवळ येतात.

व्हिडिओमध्ये, मांजर पूर्ण ताकदीने भिंत चढताना दिसत आहे. अनेकदा ती भिंतीवर चढते पण हलक्याश्या फरकाने तिचा तोल ढालळतो आणि ती खाली पडते. असे असूनही, ती हार मानत नाही आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करु लागते. खाली उभे असलेले काही लोक तिला इजा होऊ नये म्हणून एक मोठे ब्लँकेट धरून ठेवतात जेणेकरुन ती खाली पडलीच तर त्या ब्लँकेटवर पडेल. मांजरीचा हा प्रयत्न अखेर यशस्वी झाला की नाही तिची तिच्या पिल्लासोबतची भेट तर व्हिडिओत दाखवण्यात आली नाही पण व्हिडिओतील तिची धडपड पाहून यूजर्सचे डोळे भरुन आले आहेत.

बिल्ली अपने बच्चों तक पहुँचने के लिए ऊँची दीवार पर चढ़ गई। एक दिल दहला देने वाला सीन वायरल हो गया है, जिसमें एक बिल्ली बार-बार गिरती रही। फिर भी वह दूसरी तरफ अपने बच्चों तक पहुँचने के लिए ऊँची ईंट की दीवार पर चढ़ने की कोशिश करती रही। राहगीर नीचे एक बड़ा कंबल पकड़े खड़े थे और… pic.twitter.com/A7rOGwXZJM — Sidd (@SirAbdullahSidd) August 6, 2026

‘१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?’ चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

शेवटी आईच असते जी आपला जीव धोक्यात घालून मुलाचे रक्षण करते. याचे जिवंत उदाहरण आपल्याला आताच्या व्हिडिओतही पाहायला मिळेल. हा व्हिडिओ @SirAbdullahSidd नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ६६ लाखाहून अधिकचे व्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “आई मुलासाठी योद्धाच असते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आईचं प्रेम असं असतं की ती आपल्या मुलासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आपल्या ध्येयाच्या जवळ जाऊन ती अपयशी ठरत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother cat climbs wall to reach kittens heartwarming viral video mothers love animal video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.