गायीने मुलीवर हल्ला करताच ढाल बनून पुढे आली आई; गायीचा हल्ला आपल्या अंगावर घेतला अन्... Video Viral
स्वामी तिन्ही जगातला आईविना भिकारी ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. या जगात आईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिला ममतेचे प्रतीक मानले जाते पण ममतेने भरलेली हीच आई वेळ आली तर रणरागिणीचे रूप घेऊन आपल्या मुलासाठी संपूर्ण जगाशी लढायलाही तयार असते. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे ज्यात आई ढाल बनून आपल्या मुलीचे गायीच्या हल्ल्यापासून संरक्षण करताना दिसून येते. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी गायीचा हल्ला ती आपल्या अंगावर घेते. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार शेअर केला जात असून लोक आता आईच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत.
काय घडले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की गाय हल्ला करताच आईला धोका खूप गंभीर असल्याचे जाणवते. यानंतर क्षणाचाही वेळ वाया न घालवता, ती तिच्या मुलीला मागे ढकलते आणि तिच्या पुढे ढाल बनून उभी राहिले. यानंतर गे तिच्यावर आपल्या शिंगांनी हल्ला करते मात्र आई काही केल्या मागे हटत नाही आणि धैर्याने तिला लढा देते. गायीचा हल्ला बाळापर्यंत पोहोचू नये म्हणून ती प्रत्येक वेळी स्वतःला पुढे सरकवते. ही संपूर्ण घटना फक्त काही सेकंदांची आहे, पण त्यात आईला ‘आई’ बनवणारी प्रत्येक गोष्ट आहे – त्याग, धैर्य आणि ममतेची पराकाष्टा.
व्हिडिओत पुढे दिसते की, आईचा हा लढा पाहून आजूबाजूचे लोक मदतीसाठी पुढाकार घेतात आणि गायीला तेथून पळवून लावतात. काही सेकंदाचा हा व्हिडिओ अनेक गोष्टी दाखवून देतो आणि आईच्या ममतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो. हा व्हायरल व्हिडिओ @anita_suresh_sharma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आई तर आईच असते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओवर आपल्या कमेंट्स दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या जगात सर्वात मोठा योद्धा म्हणजे आई” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच आईला योद्धा म्हटले जाते. जगातील कोणतीही शक्ती त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. ती आपल्या मुलांसाठी यमराजाशी लढू शकतो. सर्व मातांना सलाम”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.