...पाहून यमराजही हादरेल! तरुणाने चक्क चालू रेल्वेच्या चाकांमध्ये बसून केला प्रवास, हैराण करणारा Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात . हे व्हिडिओज पाहून कधी आपण थक्क होतो तर कधी पोट धरून हसतो. इथे बऱ्याचदा काही जुगाड अथवा स्टंट्सचे व्हिडिओ देखील शेअर केला जातात. हे व्हिडिओज अनेकदा लोकांना हादरवून जातात कारण यात घडलेल्या गोष्टींची कोणी अपेक्षाही केलेली नसते. असोत सध्या देखील सोशल मीडियावर अशा एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओने धुडघूस घातला आहे. यातील व्यक्तीचा एक अजब जुगाड पाहून लोक हादरली आहेत. नक्की काय झाले तर सविस्तर जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर सध्या एक भयानक प्रकार व्हायरल झाला आहे. जुगाड म्हटलं की यात भारतीयांचा हाथ कोणी पकडू शकत नाही मात्र नुकताच व्हायरल होत असेलल्या जीवघेणा जुगाड पाहून तुम्ही डोक्याला हाथ लावल्याशिवाय राहणार नाहीत. यात एका व्यक्तीने चालू ट्रेनच्या चाकांवर बसून 250 किमी इतका प्रवास केल्याचे दिसून आले आहे. इतका लांबचा प्रवास त्याने गाडीच्या चाकावर बसून केला, ही गोष्ट फार आश्चर्यकारक आहे. या घटनेचा व्हिडिओ एकाने आपल्या कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काळाचा घात: बाईकची डिवाइडरला जोरदार धडक, हवेत उडाले अन् जागीच… मृत्यूचा थरारक Video Viral
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने इटारसी ते जबलपुर असा तब्बल 250 किमी प्रवास केला आहे. इतका लांब पल्ला त्याने चाकावर बसून केल्याचे म्हटले जात आहे. पण पोलिसांनी मात्र हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. त्यांच्या मते हा व्यक्ती खोटं बोलत आहे. कारण चाकं सतत फिरत असतात त्यावर बसणं अशक्य आहे. या व्यक्तीचा डोक्यावर परिणाम झालाय. तो मानसिकदृष्ट्या स्थीर नाहीये. पण पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली असून त्याची आता चौकशी केली जात आहे.
ट्रेन के पहियों के पास लेटकर एक युवक ने करीब 290 किलोमीटर का सफर किया. एमपी में गजब टैलेंटेड लोग हैं. pic.twitter.com/L5aq5SF7rR
— बलिया वाले 2.0 (@balliawalebaba) December 27, 2024
या अजब घटनेचा व्हिडिओ @balliawalebaba नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘एका तरुणाने ट्रेनच्या चाकाजवळ पडून सुमारे 290 किलोमीटरचा प्रवास केला. एमपीमध्ये गजब टॅलेंटेड लोक आहेत’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सर्व देवाची करणी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.