(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याका हसवतात, कधी रडवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे बऱ्याचदा काही थरारक आणि जीवघेण्या घटना देखील व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. व्हिडिओत अपघाताचे असे थरारक दृश्ये दिसून आले की पाहून सर्वच हादरून गेले. नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे प्रकरण?
हैदराबादमधील माधापूर परिसरात झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. अय्यप्पा सोसायटी परिसरातील 100 फूट रुंद रस्त्यावर भरधाव वेगात बुलेट बाईक दुभाजकावर आदळल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रघु बाबू आणि आकाश हे दोघे तरुण बोराबांडा येथील रहिवासी असून या अपघातात जखमी झाले आहेत. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही तरुण दुचाकीवरून हवेत उडाले आणि रस्त्यावर जाऊन आदळले. रघू बाबूचा जागीच मृत्यू झाला, तर आकाशचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.’
पोलिसांचे म्हणणे आहे की दुचाकीस्वाराने दारूचे सेवन केले असावे, त्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. अपघात झाला त्यावेळी दुचाकीचा वेग खूप होता. ही वेदनादायक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये दुचाकी दुभाजकावर आदळताच दोन्ही तरुणांनी हवेत उड्या घेतल्याचे दिसून येत आहे. हे दृश्य अत्यंत भयावह आहे आणि वेगाने वाहन चालवण्याचे धोके हायलाइट करते. अपघाताचा तपास सुरू असून दारू पिणे हे अपघाताचे मुख्य कारण आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Two killed as speeding bike crashes into divider in Hyderabad
The deceased have been identified as Raghu Babu, 30 and Aakansh, 24 from Borabanda. One of the victims died instantly, while the other succumbed to injuries en route to the hospital in Hyderabad.
24, pic.twitter.com/QLXe2zx08b— Tamreen Sultana (@ta38590) December 27, 2024
चालू फेऱ्यांमध्ये पंडित जी भडकले, केलं असं काही की… पाहून तुम्हालाही बसेल धक्का, Video Viral
अपघाताचा हा थरार @ta38590 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हैदराबादमध्ये भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू झाला. बोराबांडा येथील रघु बाबू (30) आणि आकांश (24) अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी एकाचा तात्काळ मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला’ असे लिहिण्यात आले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.