
अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या क्यूट दृश्यांमध्ये आपल्याला मोकळ्या रस्त्यावर एक स्कुटर जाताना दिसते. सामान्या वाटणारी ही स्कुटर खास तेव्हा बनते जेव्हा यावर स्वार झालेले अनोखे राडरर्स आपल्याला दिसून येतात. व्हिडिओत दिसते की, एका स्कुटरवर तब्बल पाच जण बसले आहेत आणि ते कुठेतरी जात आहेत. यातील एक सामान्य व्यक्ती असतो जो स्कुटरला चालवत असतो तर बाकीचे चार कुत्रे स्कुटरवर बसलेले असतात जे मस्त ऐटीत बसून आपल्या राईडची मजा लुटत असतात. यात लॅब्रेडॉर रिट्रीव्हर, गोल्डन रिट्रिव्हर, रॉटविलर आणि हस्की अशा चार भिन्न प्रकारच्या श्वानांचा समावेश असतो. श्वानांना असे राईड घेताना पाहून यूजर्स खुश झाले आणि लोकांनी वेगाने हे दृश्य शेअर करण्यास सुरुवात केली.
व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, मालक आपल्या सर्व श्वानांना घेऊन माॅर्निंग वाॅकला निघाला होता. पण त्यातील कोणत्याही श्वानाने मालकाच्या या निर्णयाला सहकार्य न दाखवता ते वेगवेगळ्या दिशेला पळण्याचा प्रयत्न करु लागले. शेवटी मालकाने आपली स्कुटर बाहेर काढली ज्यावर आनंदाने सर्व श्वान स्वार झाले आणि त्यांनी स्कुटर राईड घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हे दृश्य @tv1indialiv नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे किती क्युट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाकडे Z+ सिक्योरिटी आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लॅब, गोल्डन, रॉट, हस्की ते सर्वच पुकी दिसत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.