Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हात आहे की हातोडा? २१ वेळा ५० कॅन्सचा केला चुराडा, अनोख्या कारनाम्याची गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

Smashed 50 Soft Drink Cans In 21 Second : सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या विक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुहम्मद कहरीमानोविचने आपल्या हाताच्या ताकदीने अवघ्या २१.३२ सेकंदांत ५० सॉफ्ट ड्रिंक कॅन्स चिरडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2026 | 09:22 AM
हात आहे की हातोडा? २१ वेळा ५० कॅन्सचा केला चुराडा, अनोख्या कारनाम्याची गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

हात आहे की हातोडा? २१ वेळा ५० कॅन्सचा केला चुराडा, अनोख्या कारनाम्याची गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • २१.३२ सेकंदांत ५० कॅन्सचा केला चुराडा.
  • ‘हॅमरहँड’ मुहम्मद कहरीमानोविचचा अनोखा विक्रम.
  • हाताच्या ताकदीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले व्यक्तीचे नाव.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अलिकडे मात्र इथे एका अनोख्या पराक्रमाची झलक शेअर करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे व्यक्तीच्या या पराक्रमाची नोंद आता गिनिज वर्ल्ड बुकमध्ये करण्यात आली आहे. आपल्या प्रचंड ताकदीचा वापर करून, व्यक्तीने अवघ्या २१.३२ सेकंदात ५० कॅन चिरडले. या पराक्रमासाठी त्याला पारितोषिक देण्यात आलं असून जगभरातील विश्वविक्रमांची करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये व्यक्तीच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

कोण आहे हा व्यक्ती?

या व्यक्तीचे नाव आहे मुहम्मद कहरीमानोविच (Muhamed Kahrimanovic), तो आपल्या असाधारण शारीरिक ताकदीसाठी ओळखला जातो. त्याच्या याच काैशल्यामुळे त्याला हॅमरहँड असे नाव पडले आहे. याचा मराठीत अर्थ होतो लोखंडाचा हात… त्याच्या हाताच्या ताकद पाहता कुणालाही सुरुवातीला विश्वास बसत नाही. आपल्या याच हाताच्या मदतीने व्यक्तीने एकामागोएक तब्बल ५० साॅफ्ट ड्रिंक कॅन्स फोडून दाखवले आहेत. मुख्य म्हणजे असं करण्यासाठी त्याला फक्त २१ सेकंदाचा कालावधी लागला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात व्यक्तीच्या समोर एक दगडी कट्टा असून यावर काही सॉफ्ट ड्रिंक कॅन्स ठेवण्यात आले आहे. टायमर जसा स्टार्ट होतो तसा व्यक्ती एकामागोमग एक कॅन फोडायला सुरुवात करतो. आपल्या हाताच्या शक्तीने तो प्रत्येक कॅनचा चुराडा करतो आणि असं करताना त्याच्या चेहऱ्यावर एक रेषही येत नाही. २१ सेकंदात ५० कॅन फोडणे काही सोपे काम नाही. यासाठी केवळ हाताची ताकदच नव्हे, तर योग्य तंत्र, सराव आणि शारीरिक नियंत्रणाचीही आवश्यकता असते. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून यातील दृष्यांनी यूजर्सना अचंबित केलं आहे.

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

हा व्हिडिओ @mr.hammerhand नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने तरुणाच्या अनोख्या पराक्रमावर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “खरोखरच अप्रतिम आहे; हे खरं आहे यावर माझा विश्वास बसतोय”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण या कारनाम्याच्या नादात कितीतरी साॅफ्ट ड्रिंक्स वाया गेल्या”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला वाटतं त्याला साॅफ्ट ड्रिंक्स मुळातच आवडत नाहीत म्हणून आपला सर्व राग तो त्यांच्यावर काढतोय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Muhamed kahrimanovic hammerhand crushes 50 soft drink cans in 21 seconds guinness world record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Guinness Book of World Records
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
1

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
2

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर
3

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral
4

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.