Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dubai Gold Walkway: चक्क सोन्याच्या रस्त्यावर फिरता येणार! या देशात जगातील पहिला 24 कॅरेट Gold Walkway, रस्ता पाहून थक्कच व्हाल!

Dubai Gold Walkway: दुबई पुन्हा एकदा आपल्या अनोख्या प्रकल्पामुळे जगाचे लक्ष वेधून घेत आहे. दुबईच्या डीरा परिसरातील दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये जगातील पहिला २४ कॅरेट गोल्ड वॉकवे तयार करण्यात येणार आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत हा वॉकवे पर्यटकांसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2026 | 12:11 PM
चक्क सोन्याच्या रस्त्यावर फिरता येणार! या देशात जगातील पहिला 24 कॅरेट Gold Walkway, VIDEO पाहून थक्कच व्हाल!

चक्क सोन्याच्या रस्त्यावर फिरता येणार! या देशात जगातील पहिला 24 कॅरेट Gold Walkway, VIDEO पाहून थक्कच व्हाल!

Follow Us
Follow Us:
  • दुबईचा आणखी एक भन्नाट प्रकल्प!
  • सोन्याने मढवलेला वॉकवे पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढणार
  • दुबईत जगातील पहिला गोल्ड वॉकवे
Dubai Gold Walkway: दुबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात उंचच उंच इमारती, आलिशान हॉटेल्स, महागड्या गाड्या आणि जगाला थक्क करणारे भव्य प्रकल्प. आता दुबई आपल्या आणखी एका अनोख्या प्रकल्पामुळे चर्चेत आले आहे. शहरात लवकरच २४ कॅरेट सोन्याचा खास वॉकवे तयार करण्यात येणार आहे. म्हणजेच, आतापर्यंत सोन्याची खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दुबईमध्ये आता पर्यटकांना चक्क सोन्याच्या रस्त्यावरून चालण्याचा अनुभव घेता येणार आहे. (Dubai Gold Walkway)

कुठे साकारतोय सोन्याचा रस्ता?

दुबईच्या डीरा परिसरातील दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये हा अनोखा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टचे वरिष्ठ संचालक रशीद अल हमूदी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली आहे. २०२६ च्या अखेरपूर्वी हा वॉकवे सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उद्घाटनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान

नेमका किती सोन्याचा वापर होणार?

या प्रकल्पातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे वॉकवेमध्ये २४ कॅरेट सोन्याचा वापर केला जाणार आहे. मात्र, यासाठी नेमके किती सोने लागणार, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, तसेच या वॉकवेची लांबी आणि एकूण खर्च किती असेल, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता ठोस सोन्याचा असेल, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये १,००० हून अधिक दुकाने

दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टची सुरुवात जानेवारी २०२६ मध्ये करण्यात आली. सोने, दागिने, बुलियन, घाऊक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. अधिकृत माहितीनुसार, या परिसरात १,००० हून अधिक रिटेल दुकाने आहेत.

२०२६ च्या सुरुवातीपासून या ठिकाणी नवीन घाऊक सोन्याच्या व्यापार कार्यालयांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सोने, दागिने, मौल्यवान खडे आणि महागड्या घड्याळांशी संबंधित नवीन दुकानांच्या संख्येत १५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

पर्यटन आणि जागतिक सुवर्ण व्यापाराला चालना

गोल्ड वॉकवे उभारण्यामागे केवळ पर्यटकांना आकर्षित करणे एवढाच उद्देश नाही. तर दुबईला आंतरराष्ट्रीय सुवर्ण व्यापार आणि दागिन्यांच्या बाजारपेठेतील प्रमुख केंद्र म्हणून अधिक मजबूत ओळख मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे. जानेवारी २०२६ मध्ये गोल्ड डिस्ट्रिक्टच्या उद्घाटनावेळी दुबई मीडिया ऑफिसने जगातील पहिली गोल्ड स्ट्रीट तयार करण्याच्या योजनेचा उल्लेख केला होता.

आता या प्रकल्पामुळे दुबईच्या पर्यटन क्षेत्राला आणखी एक नवे आकर्षण मिळण्याची शक्यता आहे. सोन्याच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात प्रत्यक्ष सोन्याच्या वॉकवेवरून चालण्याचा अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटक उत्सुक असतील.

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुबईमध्ये २४ कॅरेट गोल्ड वॉकवे कुठे तयार करण्यात येणार आहे?

    Ans: दुबईच्या डीरा परिसरातील दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये हा खास गोल्ड वॉकवे तयार करण्यात येणार आहे.

  • Que: दुबईचा गोल्ड वॉकवे पर्यटकांसाठी कधी खुला होणार आहे?

    Ans: २०२६ च्या अखेरपर्यंत हा वॉकवे सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुला करण्याची तयारी आहे. मात्र, उद्घाटनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

  • Que: दुबईचा गोल्ड वॉकवे पूर्णपणे सोन्याचा बनवला जाणार आहे का?

    Ans: या वॉकवेमध्ये २४ कॅरेट सोन्याचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण रस्ता ठोस सोन्याचा असेल की त्यावर सोन्याचे विशेष आवरण असेल, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Web Title: Dubai worlds first 24 carat gold walkway gold district 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Dubai
  • tourism
  • Video Viral

संबंधित बातम्या

Dubai Road Accident : दुबईतील रस्ते अपघातात राजस्थानातील तिघांचा मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
1

Dubai Road Accident : दुबईतील रस्ते अपघातात राजस्थानातील तिघांचा मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Flydubai : तेल अवीव-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार? फ्लायदुबई हल्ल्याच्या चौकशीसाठी इस्रायली शिष्टमंडळ आज दुबईत
2

Flydubai : तेल अवीव-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार? फ्लायदुबई हल्ल्याच्या चौकशीसाठी इस्रायली शिष्टमंडळ आज दुबईत

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
3

Viral Video: ना झोपाळा, ना घसरगुंडी; चक्क २० फुटांच्या अजगरालाच मुलांनी बनवला खेळण्याचा झोपाळा! VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग
4

World Tennis League : बेंगळुरूमध्ये रंगणार जागतिक टेनिसचा थरार; 17 डिसेंबरपासून वर्ल्ड टेनिस लीग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.