Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar–Churchgate local चालत्या ट्रेनमध्ये दारू पिण्याचा धक्कादायक प्रकार; बाटली ट्रॅकवर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल

चालत्या ट्रेनमध्ये दारू पिणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने दारूची बाटली थेट रेल्वे ट्रॅकवर फेकल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत मोठ्या प्रमाणात नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.

  • By Dilip Bane
Updated On: Sep 29, 2026 | 12:30 PM
Mumbai Local Train Drinking Viral Video

Mumbai Local Train Drinking Viral Video

Follow Us
Follow Us:
  • चालत्या ट्रेनमध्ये दारू पिणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • दारूची बाटली रेल्वे ट्रॅकवर फेकल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद.
  • व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संताप आणि मोठ्या प्रमाणात नकारात्मक कमेंट्स.
  • चालत्या ट्रेनमध्ये अशा प्रकारे दारू पिण्याची परवानगी कशी मिळते? असा सवाल.
  • रेल्वेच्या डब्यात उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी कोणीही त्याला रोखले नाही, यावरही चर्चा.
  • सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः रेल्वे परिसरात अशा प्रकारचे गैरवर्तन केल्यास कारवाई होऊ शकते.
  • अशा घटनांमध्ये प्रवाशांनी संबंधित रेल्वे प्रशासन किंवा सुरक्षा यंत्रणेला माहिती देणे गरजेचे.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता Western Railway या प्रकरणाची दखल घेते का, याकडे लक्ष.
सध्या कलियुग सुरू आहे असं म्हटलं जातं; पण कोण कसं वागेल आणि कोण कशामुळे प्रसिद्धीच्या झोतात येईल, याचा काही नेम राहिलेला नाही. माणूस जसा वागतो, तसाच त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होत असतो. प्रत्येकाच्या विचार करण्याच्या आणि प्रतिक्रिया देण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. त्यामुळे काही जण परिस्थितीचा विचार करून वागतात, तर काही जण क्षणिक रागाच्या भरात किंवा विसंगत पद्धतीने वागतात. अशा वर्तनावर अनेकदा कोणाचाच नियंत्रण राहत नाही.हेच पाहा ना, क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर येते. खरं तर सार्वजनिक ठिकाणी आपण नेहमीच कोणाचं ना कोणाचं भांडण ऐकत किंवा पाहत असतो. मेट्रो असो, रेल्वे असो किंवा रस्त्यावरची गर्दी—छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे आता नित्याचंच झालं आहे. मात्र हा छोटासा वाद कधी टोकाला जाईल आणि त्यातून एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं, याचा अंदाज कुणालाच येत नाही.
A video of a passenger drinking alcohol inside a Virar-Churchgate local has gone viral. The passenger is standing near the door of the disabled coach while drinking. The incident took place on the Churchgate-bound local from platform 3 at Virar station. pic.twitter.com/ELSYrza3vo — Suhas Birhade ↗️ (@Suhas_News) September 28, 2026

विरार–चर्चगेट लोकलमध्ये दरवाजाजवळ उभं राहून दारू पिताना !

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. चक्क विरार–चर्चगेट लोकलमध्ये दरवाजाजवळ उभं राहून एक व्यक्ती दारू पिताना दिसत आहे. आता अशा व्यक्तीला काय म्हणावं?लोकलच्या दरवाजाजवळ उभं राहणं आधीच धोकादायक असतं आणि त्यात दारू प्यायल्यानंतर तोल गेला किंवा चक्कर येऊन खाली पडला तर? एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? स्वतःच्या जीवाची काळजी तर घ्यायलाच हवी, पण अशा प्रकारच्या वर्तनामुळे इतर प्रवाशांनाही धोका निर्माण होऊ शकतो.क्षणिक मजा किंवा प्रसिद्धीसाठी केलेली अशी कृती जीवावर बेतू शकते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होण्यापेक्षा आपला जीव आणि इतरांची सुरक्षितता महत्त्वाची नाही का?

अरे बापरे… ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले

दारूची बाटली थेट रेल्वे ट्रॅकवर फेकली!

पुन्हा त्याने ती दारूची बाटली थेट रेल्वे ट्रॅकवर फेकली! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकारावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.काही जणांचा सवाल आहे—चालत्या ट्रेनमध्ये दारू पिण्याची हिंमत कशी होते? एवढंच नाही तर बाटली थेट रेल्वे ट्रॅकवर फेकतानाही त्याला कोणी रोखलं नाही का?रेल्वेच्या डब्यात किंवा रेल्वे परिसरात अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे आणि प्रवाशांना त्रास होईल असे कृत्य करणे नियमांच्या कक्षेत येते. रेल्वे कायद्यातही ट्रेनमध्ये नशेत असणे किंवा नuisance करणे याबाबत कारवाईची तरतूद आहे.तसेच रेल्वे परिसरात कचरा किंवा वस्तू फेकण्यासही नियमांनुसार मनाई आहे.आपण सगळे सुजाण नागरिक आहोत; मात्र चुकीचे कृत्य समोर घडत असताना त्याला विरोध करण्यासाठी किंवा संबंधित यंत्रणेला माहिती देण्यासाठी किती जण पुढे येतात, हा खरा प्रश्न आहे.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता या प्रकरणाची दखल घेऊन Western Railway आणि संबंधित यंत्रणा या व्यक्तीवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी चमत्कार? भरधाव ट्रेनची धडक बसूनही गाय उठून उभी; VIDEO Viral

Web Title: Mumbai local train virar churchgate drinking viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Mumbai Crime
  • Mumbai Railway
  • train viral video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.