अखेर तो क्षण आलाच! मुंबईची ओळख कायमची पुसली जाणार... कबुतरखान्याचा शेवटचा Video Viral
मुंबईतील अनेक ठिकाणे हे शहराचा अभिमान आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे दादरमधील कबुतरखाना. या ठिकाणी कबुतरांना खाण्यासाठी धान्य टाकलं जात आणि दररोज शेकडो कबुतर इथे फिरत असतात. कबुतरांचं दुसरं विश्व म्हणजेच कबुतरखाना मात्र आता त्यांचं हे विश्व लवकरच बंद होण्याच्या वाटेवर आहे. मुंबईत कबुतरखान्यांची संख्या सातत्याने वाढत गेली पण त्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढत गेल्या. आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देता आरा राज्य सरकारने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई महानगपालिकेला दिले आहे. अशातच बंद होण्याच्या वाटेवर असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पांचट Jokes : आजीची फायनल परीक्षा… वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल
आताच्या परिस्थितीत मुंबईत तब्बल ५१ कबुतरखाने आहेत. हे कबुतरखाने तात्काळ बंद करण्यात यावे असे आदेश महानगरपालिकेला देण्यात आले आहे. आरोग्याच्या कारणास्तव घेतलेला हा निर्णय वर्षानुवर्षांपासूनची दादरची ओळख मात्र पुसून टाकणार… याच पार्श्वभूमीवर दादरमधील कबुतरखान्याचा शेवटचा व्हिडिओ आता सर्वत्र शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये कबुतरांचं खाण गोळा करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे तर यात कबुतरांचा थवा धान्य टिपून खातानाही दिसून येत आहे. मुंबईकरांना मात्र हा व्हिडिओ आता भावुक करत आहे.
दादरची ओळख असणारा कबुतरखाना अनेकांना ठाऊक आहे. मुळात तो तितकाच लोकप्रिय आहे पण कबुतरखान्यांच्या जागी असलेली कबुतरांची विष्ठा आणि त्यांची पिसे यामुळे स्थानिकांना आणि आसपासच्या लोकांमध्ये श्वसनासंबंधित आजारांचा मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळेच आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने हे कबुतरखाने बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कबुतरखाना राहत नसला तरी हा व्हिडिओ मात्र दादरकरांसाठी एक आठवण बनून राहील.
पांचट Jokes : आजीची फायनल परीक्षा… वाचाल तर हास्याने लोटपोट व्हाल
कबुतरखान्याचा हा व्हिडिओ @dadarmumbaikar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आरोग्याचा विचार केला तर योग्य निर्णय..बाकी कोणाचा पुतळा उभा करण्यापेक्षा सुंदर असे कबुतरखान्याच्या तिथे कबुतरांचे सुंदर शिल्प आकारावे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आतापर्यंतचा सर्वोत्तम निर्णय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बरं झालं, आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्याला ते धोकादायक ठरत होत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.