viral incident
सोशल मीडियावर दरदिवशी नवीन काहीतरी व्हायरल होत असत. यातील अनेक गोष्टी आपल्याला हसवतात तर काही थक्क करून जातात. या घटना तर इतक्या धक्कादायक असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते. अशातच असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ नागपुरतील असून यात एक जोडपं चक्क नग्न अवस्थेत फिरताना दिसत आहे. या जोडप्याचा व्हिडिओ रस्त्यावरून जणाऱ्यांनी आणि दुचाकीस्वारांनी आपल्या कॅमेरात कैद केला आणि मग सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यातच आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नागपुर शहरातील उच्चभ्रू वस्ती असणारी लक्ष्मीनगर येथे शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा विचित्र प्रकार घडून आला. यात दिसले की, एक तरुण नग्न अवस्थेत भररस्त्यात फिरत होता तर त्याच्या मागे पत्नीही नग्न अवस्थेत त्याच्या मागे धावत होती. सांगितले जात आहे की, दोघांमध्ये आधी वाद झाला आणि या वादानंतर आधी तरुण नग्न अवस्थेमध्ये रस्त्यावर निघाला आणि मग त्याच्या मागोमाग त्याची पत्नीही त्याच्या मागे नग्न अवस्थेमध्ये रस्त्यावर फिरू लागली. ही धक्कदायक घटना याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने शूट केला आणि मग हा व्हिडियो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानांतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवू लागला. अनेकजण हा व्हिडिओ पाहून अचंबित झाले आहेत आणि त्यांनी असे का केले असावे असा प्रश्न आता अनेकांच्या मनात घोंघावत आहे.
हेदेखील वाचा – महिला गाढ झोपेत, केसांत घुसला साप अन् मग जे झालं… चित्तथरारक घटनेचा Video Viral
सदर व्हिडिओ व्हायरल होताच स्थानिक पोलिसांनी लगेच या घटनेची दखल घेतली आणि या दाम्पत्याचा शोध सुरु केला. त्यानांतर या जोडप्याला पोलीस ठाण्याला आणण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्य्नाचे कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. यावेळी दोघेही मानसिक रूग्ण असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी संगितले आहे. यानंतर त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नसून लवकरात लवकर त्यांच्यावर उपचार करावेत असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे.
घटनेचा व्हिडिओ @Nagpur Today या चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान नागपूरमध्ये मागील काही काळात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत, ज्या पाहून अनेकांच्या मनात गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. मागेही एका कपलचे धावत्या दुचाकीवरील अश्लील चाळे व्हायरल झाले होते त्यानंतर आताची ही घटना पाहून नक्की नागपुरात घडतंय तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे…