लफडं बाहेर येताच नवऱ्याने स्वतःच्याच बायकोच प्रियकराशी लावून दिलं लग्न... लोक म्हणतायेत, "नवरा असावा तर असा"; Video Viral
सोशल मीडियावर आजवर अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर झाले आहेत. हे व्हायरल व्हिडिओज नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे असतात. आताही इथे एक धक्कादायक घटना वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात एका नवऱ्याने आपल्याच पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून लोक आता या घटनेने हादरले आहेत. नवरा-बायकोचे नाते हे बाकी नात्यांहून काहीसे वेगळेच असते, यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा अशा सर्व गोष्टी असतात. जोडीदाराच्या आनंदताच आपला आनंद मानावा असे सल्ले आपल्याला अनेकदा दिले जातात मात्र आता सध्याच्या घटनेतील नवऱ्याने हा सल्ला आपला खऱ्या आयुष्यात जास्तच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशातील संत कबीर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याची आता सर्वत्र चर्चा रंगत आहे. एका पतीने आपल्या प्रेमाचा त्याग करून आपल्या पत्नीच्या आनंदासाठी तिच्या प्रियकरासह तिचे लग्न लावून दिले. सर्व पंचायतीसमोर हे लग्न लावण्यात आले. व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला लोकांचा घोळखा दिसून येत आहे. यात प्रियकर आणि पत्नी सामोरासमोर उभे असून दोघांनीही गळ्यात फुलांच्या माळा घातल्याचे दिसून येते. यानंतर प्रियकर महिलेच्या भांगेत सिंदूर भरतो. व्हिडिओत पत्नीला अश्रू अनावर झाल्याचेही दिसून येत आहे.
घटनेतील नवरा-बायकोचे 2017 साली लग्न पार पडले. दोघांचाही सुखाचा संसार सुरु होता. बबलू उदरनिर्वाहाच्या शोधात घराबाहेर असायचा.आपल्या बायकोचे दुसऱ्या कोणाशी अफेअर असल्याचे समजताच त्याने धनघाटा तहसील गाठले. तेथे प्रतिज्ञापत्र तयार केले आणि दानिनाथ शिव मंदिरात आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. नवऱ्याने दोन्ही मुलांची जबाबदारी घेण्याचे ठरवले. त्याने पत्नीला सांगितले की, आता तू स्वतंत्र झाली आहेस, तू तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर.
A husband got his wife married to her lover, They had a relationship for 12 years and also had 2 children, But the Wife was not interested to live in with her husband, Santkabir Nagar Up
pic.twitter.com/tLRuCDZGwA— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 26, 2025
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘एका पतीने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावले, त्यांचे 12 वर्षे प्रेमसंबंध होते आणि त्यांना 2 मुलेही होती, पण पत्नीला तिच्या पतीसोबत राहण्यास रस नव्हता’ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हिंदू विवाह कायद्यानुसार द्विविवाहाला बंदी आहे का? इथे याला परवानगी कशी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्यांना मुक्त करा हे पतीने खूप गांभीर्याने घेतले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.