(फोटो सौजन्य:X)
प्राण्यांशी संबंधित एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल धुमाकूळ घालत आहे, यातील दृश्ये इतके रोमांचक आहेत की ते पाहून तुम्हाला हसू फुटेल. काळानुसार मानवाने जरी बरीच प्रगती केली असली तरी प्राणी मात्र या शर्यतीत अजूनही मागेच आहेत. प्राण्यांचे मुळात आयुष्यच वेगळे, मानवी जीवनातील अनेक गोष्टी प्राण्यांसाठी नव्या आणि अनोखळी आहेत. अशात ते जेव्हा या गोष्टी पाहतात तेव्हा त्यावरील त्यांची प्रतिक्रिया सर्वांनाच आनंदित करते. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात आरशात आपला चेहरा पाहताच प्राण्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत. व्हिडिओतील हे दृश्य फार अनोखे असून आता ते लोकांच्या मनोरंजनाचे काम करत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांचे मन याकडे खचले गेले. व्हिडिओ शेअर होताच अनेक युजर्सने तो पाहिला आणि कमी वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओतील प्राण्यांचा प्रतिक्रिया अनेकांना सुखावणाऱ्या आहेत. यातील काही दृश्य तुम्हाला हसवूही शकतात. प्राण्यांचे हे अनोखे रूप आता युजर्सच्या चांगल्याच पसंतीस पडले असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, आरशात स्वतःला पाहणारा बिबट्या त्याला खरा प्राणी समजतो आणि हळू हळू त्याच्या जवळ जातो, जणू काही तो त्याचा सामना करण्याच्या तयारीत असतो. त्याच वेळी, एक हत्ती बराच वेळ आपल्या सोंडेने आरशाला स्पर्श करत राहतो आणि ही गोष्ट काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अस्वल आणि चिंपांझी आरशासमोर आपली ताकद दाखवतात. जंगलाचा राजा, सिंह देखील आरशात आपले प्रतिबिंब पाहतो आणि रागाने ते आपल्या पंजाने ओरबाडण्याचा प्रयत्न करतो. आरसा पाहताच एक इवलासा प्राणी घाबरतो आणि तेथून पळून जातो. हा मजेदार व्हिडिओ आता अनेकांच्या मनोरंजाचे काम करत आहे.
It’s so crazy that this is probably the first time any of those animals have clearly seen themselves like that pic.twitter.com/l3bAsLmTQ8
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) March 24, 2025
अरे अक्कल काय गहाण ठेवली का? व्यक्तिने चक्क महिलेच्या स्कर्टला लावली आग; धक्कादायक Video Viral
प्राण्यांचा हा व्हायरल @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हे फार मजेदार आहे, कदाचित पहिल्यांदाच त्या प्राण्यांनी स्वतःला असे स्पष्टपणे पाहिले असेल’ असे लिहिले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या प्रतिक्रिया अमूल्य आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्राणी खूप मजेदार आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.