
Pakistan Viral Video
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांना टीकांचा आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. कारण पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी थेट एका महिला पत्रकाराला डोळा मारला होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लेफ्टनंट जनरल अहमद चौधरी यांनी तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी महिला पत्रकाराला डोळा मारला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पत्रकार चौधरी यांना इम्रान खानवरील आरोपांबद्दल आणि त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेला धोका, देशद्रोही अशा लावलेल्या लेबलबद्दल प्रश्न विचारत आहे. तसेच हे प्रकरण पूर्वीपेक्षा वेगळे आहे का, विकासची काय अपेक्षा आहे, अशा गोष्टींबद्दल विचारत आहे. यावेळी यावर उत्तर देताना लेफ्टनंट चौधरी यांनी महिला पत्रकाराला, इम्रान खान मानसिक रुग्ण आहेत असे त्यांनी म्हटले. यानंतर त्यांनी पत्रकाराकडे बघून स्माईल दिली आणि डोळा मारला.
व्हायरल व्हिडिओ
Pakistan’s Army’s DG ISPR winking at a female journalist after she questioned why they are being labelled as funded by Delhi. Honestly, I am not even surprised.pic.twitter.com/FzA4SMgSM8 — Elite Predators (@elitepredatorss) December 9, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक पाकिस्तानी अधिकारी महिलांना असे ट्रीट करतात का असा प्रश्न करत आहे. त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. हे अगदी निर्लज्जास्पद असल्याचे लोकांनी म्हटले आहे. शिवाय इम्रान खान यांना मानसिक रुग्ण म्हटल्याने देखील पाकिस्तानमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये संताप उसळला आहे. या व्हिडिओने सध्या पाकिस्तानमध्ये प्रचंड धुमाकूळ घातली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.