पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानी महिला पत्रकाराला बैलाने टक्कर मारली आहे. बकरी मंडीत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना महिला पत्रकारासोबत ही घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला रिपोर्टर प्राण्यांजवळ उभा राहून प्रश्न विचारत आहे. याच वेळ अचानक एक बैल मागू येतो आणि तिला थेट डोक्यावर टक्कर मारतो. महिला जमिनीवर पडते. व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की बैलाची शिंगे मायक्रोफोमध्ये अडकली आहे. सुदैवाने महिला रिपोर्टर कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. तेथील लोकांनी तिला ताबडतोब उचलले आहे. परंतु अनेकांनी कॅमरामॅनवर टीका केली आहे. कारण आपल्या सह-कर्मचारीला वाचवण्याऐवजी तो रेकॉर्ड करत राहिला आहे.
पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा; महिला पत्रकाराला थेट मारला डोळा, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
@gharkekalesh pic.twitter.com/ucWcRfEkfQ — Arhant Shelby (@Arhantt_pvt) July 2, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Arhantt_pvt या अकाउंटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने अशा घटना पाकिस्तानमध्येच का घडतात असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एकाने पाकिस्तानी लोकांसोबत असेच झाले पाहिजे असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी देखील पाकिस्तानमधून असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे, जे हास्याचे पात्र बनले आहेत. सध्या या व्हिडिओ जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






