
पॅराग्लायडिंग की मृत्यूचा खेळ? ४ तास हवेच लटकत राहिला तरुण अन् मग... दृष्ये पाहून अंगावर येईल काटा; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओत घडलेली घटना चित्रपटातील एका सीनहून काही कमी वाटत नाही. वास्तविक घडलं असं की, चीनमधील नानचेंग शहरात, एका पॅराग्लायडरचा पॅराशूट अचानक निसटला आणि तो एका बांधकाम साईटवरील क्रेनमध्ये अडकला. मुख्य म्हणजे या घटनेत तब्बल ४ तास व्यक्तीचा संघर्ष सुरु होता. व्हिडिओमध्ये पॅराशूटची दोरी एका मोठ्या टॉवर क्रेनच्या वरच्या भागात अडकल्याचे दिसते. व्यक्ती जमिनीपासून २०० फूट उंचीवर लकटला होता जिथून ज्याचा बचाव फार कठीण वाटत होता.
४ तासांनी मिळाली मदत
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ६ वाजता स्थानिक लोकांनी जेव्हा व्यक्तीला टाॅवरजवळ लटकताना पाहिलं तेव्हा ते थक्क झाले. स्थानिकांनी लगेचच रेस्क्यू टीमला घटनेची माहिती दिली आणि ज्यानंतर एक पथक तिथे दाखल झालं. व्यक्ती लटकत असलेल्या ठिकाणी खालच्या बाजूला बांधकामाचा मलबा आणि खोल खड्डे असल्याकारणाने खाली गाडी पसरवणं शक्य नव्हतं. अशावेळी टीमने प्रसंगावधान दाखवत २३६ फूट लांबीच्या सीढीचा वापर करत ते वर पोहचले. टीमने साधारण १० वाजताच्या सुमारास व्यक्तीला सुरक्षित खाली उतरवल्याची माहिती आहे.
🇨🇳 Nanchong, #China (June 19). A paraglider became entangled in a tower crane. He hung there for 4 hours pic.twitter.com/ahPURmyumL — Ian Collins (@Ian_Collins_03) June 21, 2026
डिहाइड्रेशनची समस्या
व्यक्ती चार तास हवेत लटकत असल्याकारणाने त्याची प्रकृती काहीशी ढासळळी होती. सुदैवाने या अपघातात त्याला कोणती गंभीर दुखापत झाली नाही परंतु भूखेने व्याकूळ असल्याकाराणाने आणि चार तास पोटात काहीच न गेल्याने त्याला डिहाइड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागले. वेळीच व्यक्तीला मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला अन्यथा त्याचा जीवही जाण्याची शक्यता होती.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.