-57°C तापमान, रक्त गोठवणारं पाणी; तरीही न थांबता ९ दिवस ६८७ किमी पोहून गेलं अस्वल, पाहा Video
पृथ्वीवराचा धृवीय प्रदेश म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चहूबाजूंनी बर्फ आणि कुठे पाणी असलंच तरी रक्त गोठवणारं. अशा प्रदेशात पोहण्याचा विचार सोडा पण पाण्यात हात सुद्धा घालताना अंगावर काटा येतो. मात्र कल्पना करा जर कोणी या बर्फाळ प्रदेशात ते ही -57°C तापमानात ६८७ पोहून गेलं असेल तर, आणि तेही न थांबता सलग ९ दिवस. तुम्ही जे काही ऐकताय त्यावर विश्वावस बसणार नाही, पण हे सत्य आहे. पण तो कोणी माणूस नाही तर अस्वल आहे. एका मादी ध्रुवीय अस्वलाने अलास्काच्या उत्तरेकडील बर्फाळ ब्यूफोर्ट समुद्रातून तब्बल ६८७ किलोमीटर पोहून पार केलं आहे. यावरून अस्वलाची थंड पाण्यातील सहनशक्ती आणि ताकदीचा अंदाज येऊ शकतो, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A polar bear was recorded having traveled 9 days straight without stopping! pic.twitter.com/vZgxnWrwwC
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) February 23, 2024
२०११ च्या सुरुवातीला मीडियाने धृवीय अस्वलं मोठ्या प्रमाणात पोहून स्थलांतर करत असल्याची वृत्त प्रसारीत केली होती. आता असा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा समोर आला आहे, ज्यामुळे हवामान बदल आणि वन्यजीवांच्या अस्तित्वाबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. X वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, ध्रुवीय अस्वल तुकड्यांच्या बर्फाच्या तुकड्यांवरून पोहताना दिसत आहे, आकाशातून याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या शास्त्रज्ञांनी २००८ च्या अखेरीस या मादी अस्वलाला पहिल्यांदा कॉलर लावला होता. तेव्हा स्थापित केलेल्या रेडिओ ट्रान्समीटरचा वापर करून तिच्या प्रवासाचा मागोवा घेतला होता. तिचा नऊ दिवसांचा पोहून केलेला प्रवास हे अन्न आणि योग्य निवासस्थानाच्या शोधाचा एक भाग असल्याच, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
तथापि, ६८७ किमी पोहल्यानंतरही तिचा प्रवास संपला नाही. ध्रुवीय अस्वलाने तिची ही कष्टदायी मोहीम सुरू ठेवली, नवीन बर्फाच्या तुकड्याच्या शोधात अतिरिक्त १,८०० किमी अंतर कापलं. या प्रवासात त्या मादी अस्वलाचं वजन जवळजवळ २० टक्के कमी झालं. दरम्यान अन्नाशिवाय नऊ दिवस अस्वल कसं राहिलं, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.