Pune viral video woman sits on bike's petrol tank, on busy road Video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स, कधी स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये प्रेमी युगलांचे देखील अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी यांचे डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात, तर कधी भर रस्त्यात अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर पुण्याती असाच एक कपल्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भर रस्त्यात या जोडप्याने असे काही कृत्य केले आहे की, लोकांनी कपाळालाच हात लावला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेडशिवापूर परिसरातून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे गाडीवरुन जाताना दिसत आहे. यामध्ये तरुणी थेट गाडीच्या पेट्रोल टाकीवर उलटी बसली आहे. तरुण गाडी चालवत तिच्याशी गप्पा मारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोडप्याला चांगला झटका बसला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सध्या जोडप्याची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. जोडप्यांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांना चांगलाच दणका बसणार आहे.
मराठी गाण्याचा डंका आता जर्मनीत; प्राइड परेडमध्ये वाजलं ‘तांबडी-चामडी’, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ सर्वत्र खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, ‘घरी जावा’ असे म्हटले आहे , तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ‘सरकारने oyo चे भाडे कमी करावी अशी विनंती’ असे म्हटले आहे. आणखी एकाने ‘व्हिडिओ काढणाऱ्याला पुरस्कार द्या, नको तिथे नाक खुपसतात ही लोक’ असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
लाजिरवाणे! निसर्गाच्या कुशीत भारतीयांकडून कचरा; परदेशी पाहुण्याच्या वर्तनाने बसली चपराक, Video viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.