
सीएसकेचा मेंटॉर म्हणून पाहणार काम
सीएसकेकडून खेळणाऱ्या धोनीने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर त्याने आपल्या सोशल मिडिया पेजवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीतील काही अत्यंत सुवर्ण आणि संस्मरणीय क्षण पाहायला मिळत आहेत.या भावनिक पोस्टसाठी धोनीने एका खास गाण्याची निवड केली असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी मला नेहमीच चुकीचे ठरवले, असे धोनीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त
या भावनिक पोस्टसाठी धोनीने एका खास गाण्याची निवड केली, ज्याची सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट २०२० मध्ये जेव्हा त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती तेव्हा देखील त्याने हेच गाणे वापरले होते. अमिताभ बच्चन यांच्या ‘कभी कभी’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘मैं पल दो पल का शायर हूँ…’ हे लोकप्रिय आणि अजरामर गाणे त्याने आपल्या पोस्टमध्ये वापरले आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतली असली तरी देखील तो चेन्नई सुपर किंग्जसोबत असल्याचे पाहायला मिळणार आहे. आता आयपीएल 2027 च्या हंगामापासून धोनीचा खेळाडू म्हणून मैदानातील प्रवास अधिकृतपणे संपला आहे. चेन्नई सुपरकिंग्स (CSK) फ्रँचायझीने त्याला आगामी हंगामासाठी खेळाडू म्हणून रिलीज केले असून, आता तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो आता सीएसकेचा मेंटॉर म्हणून काम करताना चाहत्यांना दिसणार आहे.
MS Dhoni IPL Records : नेहमीच चेन्नईसाठी तारणहार ठरलाय एम. एस. धोनी; रेकॉर्ड पहाल तर थक्क व्हालं
2008 पासून आयपीएल सुरू झाले आणि धोनीने सीएककेकडून खेळण्यास सुरुवात केली. आयपीएलच्या अगदी पहिल्या पर्वात झालेल्या लिलावात चेन्नई सुपरकिंग्स फ्रँचायझीने एमएस धोनीला विक्रमी आणि सर्वाधिक बोली लावून आपल्या संघात सामील करून घेतले होते. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 5 वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
Ans: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Ans: निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनीने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक सुवर्ण आणि संस्मरणीय क्षण पाहायला मिळत आहेत.