
Auto Driver Arrested for Harassing Thai YouTuber, Asked for Lip Kiss ( थाई युट्युबरला त्रास दिल्याप्रकरणी आणि ओठांवर किस (lip kiss) मागितल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक )
एक थायलंडची रहिवासी असलेली महिला राजस्थानमधील उदयपूर येथे पालिकेच्या जत्रेत फिरायला आली होती. या वेळेस ती या जत्रेचेलाईव्ह-स्ट्रीमिंग करत होती. आचानक एक स्थानिक रिक्षावाला आला आणि या महिलेला वारंवार विचारू लागला, ‘वन लिप किस प्लीज’ त्या तरुणीने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आणि तो व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर साईडवर शेअर केला.
या व्हिडिओ वरुन असे लक्षात येते की, हे धार्मिक लोक अशा गोष्टी करून जागतिक स्तरावर आपल्या भारताची प्रतिमा डागाळत आहेत.या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. असे लोकांचे मत आहे.
ये है उदयपुर के ऑटो ड्राइवर आफ़ताब
इन्होंने इतने अच्छे काम किए हैं जिससे भारत के माथे पर चार चांद लग गए। दरअसल इस महाशय ने विदेशी टूरिस्ट से लीप kiss मांग रहा था।
और महिला मना कर रही है।
जब इसे पकड़ा तो माफ़ी मांग रहा है।
क्या इसे माफ किया जाना चाहिए?? https://t.co/45e6Rtj4l8 — पार्थ 🚩 (@abhik__00) November 17, 2026
राजस्थानमधील उदयपूर येथे लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान एका थाई-फ्रेंच वंशाच्या महिला यूट्यूबरचा छळ केल्याचा आणि जबरदस्तीने ओठांचे किस मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, उदयपूर पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि आरोपी ऑटोचालक आफताब उर्फ गबरू याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने दोन दिवसांत आपल्या रिक्षातून या महिलेला विविध ठिकाणी नेले होते.
राजस्थानमधील उदयपूर येथे फिरण्यासाठी आलेल्या एका थाई युट्युबरसोबत एका रिक्षाचालकाने गैरवर्तन केल्या नंतर या घटनेतील आरोपी आफताब ऊर्फ ‘गब्रू’ यांने आपला माफीनामा कबुल केला आहे. आरोपी आफताब ने म्हटले आही की, “मला खूप लाज वाटते मी हात जोडून माफी मागतो, पुन्हा अशी चुकी करणार नाही. बाहेरुन आलेल्या परदेशी पाहुण्यांचा आदर केला पाहीजे असे म्हटले आहे. “