Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐकावं ते नवलंच! रेल्वे कर्माचाऱ्यानं दोनदा सापाला चावलं; पण साप मेला आणि माणूस बचावला, नेमकं घडलं काय?

रेल्वे कर्मचाऱ्याला साप चावल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी त्या कर्मचाऱ्याने दोनदा सापाला चावा घेतल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. या घटनेत रेल्वे कर्मचाऱ्याचा नाही तर चक्क सापाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2024 | 02:59 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

सापानं चावल्यामुळे एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. साप माणसाला चावल्यानंतर सापाच्या विषामुळे माणसाचा मृत्यू होतो. पण माणूस चावल्यामुळे सापाचा मृत्यू झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? बिहारमध्ये अशी एक अजब घटना घडली आहे. माणसानं चावल्यामुळे चक्क सापाचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याला साप चावला आणि या गोष्टीचा बदला घेण्यासाठी तो रेल्वे कर्माचारी देखील सापाला चावला. एकदा नाही तर तब्बल दोन वेळा या रेल्वे कर्मचाऱ्यानं सापाचा चावा घेतला. या अजब घटनेत रेल्वे कर्मचाऱ्याचा नाही तर चक्क सापाचा मृत्यू झाला आहे. आपण या गोष्टीचा कधी विचार देखील केला नसेल. जो साप चावल्यानं माणसाचा मृत्यू होतो, आता त्याच सापाला माणसानं चावलं आणि चक्क सापाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. सर्पदंशानंतरही माणूस जिवंत राहिला आणि माणसानं चावल्यामुळं सापाचा मृत्यू झाला आहे.

संतोष लोहार (वय ३५) असं या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. संतोष झारखंड लातेहार जिल्ह्यातील पांडूका येथील रहिवासी आहे. तो बिहारमधील रजौलीच्या घनदाट जंगलात रेल्वे रुळ टाकण्याचं काम करतो. संतोष मंगळवारी रात्री काम आटोपून घरी आला. झोपायला जात असताना त्याला सापानं दंश केल्याचे लक्षात आलं. यानंतर संतोषने त्या सापाला हातात पकडलं. बदला घेण्यासाठी संतोष पुन्हा त्या सापाला चावला. एकदा नाही तर तब्बल दोनवेळा संतोष त्या सापाला चावला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत सापाचा मृत्यू झाला आणि संतोषला काहीही झालं नाही. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी संतोषला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोषवर उपचार करण्यात आले आणि त्याची प्रकृती आता स्थिर आहे. भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. पण माणसानं चावल्यामुळे सापाचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना असावी. काही वर्षांपूर्वी ओदिशातल्या जाजपूर जिल्ह्यात एका व्यक्तीला सापानं दंश केल्याची घटना घडली होती. त्याचा बदला घेण्यासाठी संबंधित व्यक्ती पुन्हा सापाला चावला. या घटनेत देखील सापाचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे सर्पदंशानंतरही संबंधित माणूस जिवंत राहिला.

Web Title: Railway worker bit a snake twice but the snake died and the man survived what really happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 02:59 PM

Topics:  

  • bihar
  • Wild Animals

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?
2

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

Bihar Opinion Poll: जातीच्या अंकगणिताने खेळ बदलणार! बिहारच्या कोणत्या झोनमध्ये NDA ठाम राहणार तर MGB ला कोणत्या भागात विजय मिळेल?
3

Bihar Opinion Poll: जातीच्या अंकगणिताने खेळ बदलणार! बिहारच्या कोणत्या झोनमध्ये NDA ठाम राहणार तर MGB ला कोणत्या भागात विजय मिळेल?

Maharashtra Politics: “…त्यावर बोलण्याची गरज नाही”; ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर नाना पटोलेंनी संपवला विषय
4

Maharashtra Politics: “…त्यावर बोलण्याची गरज नाही”; ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर नाना पटोलेंनी संपवला विषय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.