काय छत्री न काय रेनकोट! याला म्हणतात देशी जुगाड… भर वरातीत आला पाऊस अन् नवरदेवाला घोड्यासकट केलं पॅक; मजेदार Video Viral
पावसाळा हा ऋतू फिरण्यासाठी खूप खास मानला जातो. बहुतेक लोक या ऋतूत सुंदर ठिकाणी फिरायला जातात किंवा काहीजण घरीच बसून पावसाची मजा लुटतात. या वातावरणात बाहेर माती, चिखल, कीटक या सर्वच गोष्टींमुळे लोक घराबाहेर जाणे विशेषतः टाळतात. अशातच नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात भरपावसात लग्नाची मिरवणूक निघाल्याचे दृश्य दिसून आले आहे. ज्या पावसात आपण साधं घराबाहेर निघण्याचा विचार करत नाही त्यातच मुलाची भलीमोठी लग्नाची मिरवणूक पावसात निघाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मुख्य म्हणजे हा पाऊस अचानक पडल्यामुळे वराला घोड्यासह अक्षरशः प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करण्यात आले जे पाहणे फार हास्यास्पद ठरले. चला व्हिडिओत नक्की काय काय घडलं तेसविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये वर संपूर्ण वर्हाड्यांसह लग्नासाठी सज्ज झाल्याचे दिसून आले. एकीकडे पावसाने वरातीवर पाण्याचा शिडकाव केला पण वरही मागे राहतोय का… वरानेही मानली नाही हार आणि थेट देसी जुगाडाने केले स्वतःचे संरक्षण! व्हिडिओमध्ये वर घोड्यावर बसला असून घोड्यासह त्याच्यावर एका प्लास्टिक कव्हरची चादर ओढल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यानंतर कॅमेरा अँगल बदलताच त्याच्यासमोर आपल्या वर्हाडीही दिसून येतात जे पावसातही मोठ्या उत्साहात लग्नाचा आनंद साजरा करत नाचताना, गाण्यावर थिरकताना दिसून आले. हे सर्व पाहून असं वाटत की, वर्हाडीही म्हणत असतील ‘भिजलो तरी चालेल, लग्न थांबले नाही पाहिजे’. पावसाळी वारातीतील हे मजेदार दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे जे चांगलेच व्हायरल होत आहे. लोक पावसाने लग्नाची केलेली फजिती आणि त्यातही वर्हाड्यांनी लुटलेला आनंद या सर्वच गोष्टींचे आता मन भरून आनंद लुटत आहेत.
आंधी आए या तूफान, शादी बहुत ज़रूरी है😂 pic.twitter.com/EBB3B5RkpB
— The News Basket (@thenewsbasket) August 5, 2025
अनोख्या या वरातीचा हा व्हायरल व्हिडिओ @thenewsbasket नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतक्या संकटांना आमंत्रण दिल्यानंतर, तो आणखी एका संकटाला आमंत्रण देणार आहे; भाऊ, त्याच्यात खूप धाडस आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वादळाला तोंड देण्यासाठी तुम्हाला वादळातून जावेच लागेल, कारण लग्न हे एकदाच होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.