
छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थानच्या धौलपुर जिल्ह्यातील सरमथुरा (Sarmathura) नावाच्या लहान शहरात घडून आली. गावात अचानक १० फूटांचा भलामोठा अजगर पाहिल्याने लोक घाबरली आणि आता काय करावं ते लोकांना सुचेनासं झालं. अशात एक महिला धैर्याने पुढे आली आणि तिने अजगराच्या शेपटीला एका रश्शीने बांधत रश्शीसोबत अजगरालाही खेचतच गावाबाहेर काढले. महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच ट्रेंड करत आहे. यात महिला संपूुुर्ण ताकदीने रश्शी खेचत पुढे जाताना दिसते आणि तिच्या मागून जमिनीवर अजगर फरफटत तिच्या मागेमागे जाताना दिसतो. शेतांमध्ये अजगराने कोणत्याही माणसाला इजा पोहोचवू नये म्हणून महिला मोठ्या धैर्याने अजगराला शहराबाहेर काढते. मुख्य म्हणजे व्हिडिओमध्ये महिलेसोबत आणखी काही महिलाही तिला साथ देताना आणि प्रोत्साहित करताना दिसतात. ही घटना सिद्ध करते की, ही घटना महिलेच्या धैर्याची आणि प्रसंगावधानाची झलक दाखवते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने गावकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करत अजगराला वस्तीतून दूर नेण्याचा प्रयत्न केला. तिच्या या धाडसाचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.
हा व्हिडिओ @dharmbai_dholpur नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “अरे व्वा, देशाची नारी, सर्वांवर भारी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अजगरही म्हणत असेल की, उगाच मी या भागात आलो, हे लोक तर खूपच धोकादायक आहेत”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हाहा, अजगर मनातल्या मनात महिलांची माफी मागत असेल”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.