Renowned author Sudha Murthy distributed prasad to devotees at the Mahakumbh Mela in Prayagraj
संस्कृती आणि नद्यांच्या संगम स्थळ म्हणून ओळखले जाणारे प्रयागराज हे ठिकाण सध्या महाकुंभमेळ्याने गजबजले आहे. या मेळाव्यासाठी जगभरातून कोच्यावधी भाविकांनी हजेरी लावली असून हा मेळाव जगतील सर्वात मोठा महाकुंभमेळावा आहे. या कुंभमेळ्याव्यासाठी देश विदेशातून अनेक नामवंत व्यक्ती सहभागी झाले आहेत. ॲप्पलचे दिवंगत संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन याही या मेळ्यात सहभागी झाल्या होत्या. याचप्रमाणे इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा साधेपणा आणि आस्था या प्रसंगी प्रकर्षाने दिसून आली.
प्रयागराजमध्ये सुधा मुर्तींचा साधेपणा
सुधामूर्ती या नुकत्याच प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. या ठिकाणी त्यांच्या साधेपणाने अनेकांचे लक्ष वेधले. सहसा श्रीमंत लोक विमानतळावरुन बाहेर पडताना मोठ्या बॅगा घेऊन प्रवास करतात. मोठ्या गाड्यांमधून देव-दर्शनाला जातात. त्यांना रांगेत उभा राहण्याची देखील गरज पडत नाही. मात्र सुधा मूर्ती यांच्या खांद्यावर एकच छोटीशी बॅग होती. या ठिकाणी त्यांनी प्रसाद वाटपाचे काम देखील केले. सुधा मूर्ती या राज्यसभेच्या खासदार असूनही साधेपणाचे उत्तम उदाहरण आहेत. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे, मात्र त्या नेहमीच सामान्य जीवनशैली जगतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी भक्तांना प्रसादाचं वाटप केलं.#MahaKumbh2025 #MahaKumbh2025 #mahakumbh2025ondd #Mahakumbh #SudhaMurthy pic.twitter.com/vUHqdiiOAZ
— Viral Content (@ViralConte97098) January 23, 2025
सुधा मूर्तींनी केला आनंद व्यक्त
माध्यमांशी बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या, “प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्याचा खूप आनंद आहे. 144 वर्षांनंतर हा महाकुंभ येतो, त्यामुळे मी खूप उत्साही आणि आनंदी आहे.” त्या तीन दिवस महाकुंभ मेळ्यात सहभागी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाकुंभातील सहभागादरम्यान सुधा मूर्ती यांनी संगमात पवित्र स्नान केले आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण विधी केला.
“माझे आजोबा-आजी प्रयागराजला येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ तर्पण करण्याची मला संधी मिळाली. यामुळे मी खूप आनंदी आहे,” असे त्या म्हणाल्या. सुधा मूर्ती यांचा साधेपणा, सामाजिक भावना आणि आध्यात्मिक श्रद्धा यामुळे त्या लाखो लोकांसाठी प्रेरणादायक ठरतात. अब्जावधींच्या संपत्तीच्या मालकीण असूनही त्यांनी साधेपणाचा आदर्श कायम ठेवला आहे, जो अनेकांसाठी अनुकरणीय ठरतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.