Viral Video: चिमट्याने केस स्ट्रेट करण्याचा जुगाड तरुणीला पडला महागात; केसांना आग लागली अन्...( फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात की हसूहसून पोट दुखून येते. तसेच स्टंटचे देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असताता. आपल्या भारतात स्टंट जुगाड करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. पण अनेकदा हे जुगाड करणारे स्टंट करणार लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून घेतात.
थोडेसे पैसै वाचवण्याच्या उद्देशाने लोकांसोबत असे काहीतरी घडते की यामुळे आयुष्यभर त्रास सहन करवा लागतो. काही जुगाड कामी येतात पण अनेकदा काही जुगाड आपल्याला धोक्यात आणतात. तरी देखील अतिउत्साही लोक मागे हटत नाहीत आणि भलतंच अंगाशी येते. असाच काहीसा प्रकार या तरुणी सोबत घडला आहे. केसं स्ट्रेट करण्यासाठी केलेला जुगाड तरुणीला चांगलाच महागात पडला आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तरुणीने किचमध्ये वापरणार एक चिमटा घेतला आहे. ती त्या चिमट्याला तव्यावर गरम न करता थेट गॅसवर गरम करते. त्यानंतर ती केसांना सरळ करते. हे सगळे ती अगदी हळहळू करत असते. मात्र, अचानक केसांना चिमटा लावताच केस तूटून त्या चिमट्याला अडकतात. तिच्या ते लक्षात येत नाही. ती चिमटा पुन्हा गरम करणार तेवढ्यात चिमट्याला असलेल्या केसांना आग लाग. सुदैवाने ही आग अगदी लहान होती. यामुळे तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली आ नाही. मात्र, मोठी दुर्घटान देखील घडली असती. बाहेर केसं स्ट्रेट करण्यासाठी कमीत कमी तीन हजार रुपये लागतात पण तरीही हा असा जुगाड हजारोंमध्ये मगहागात पडू शकतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @miniandmimivibes या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाको लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर मजेशीर अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. तसेच एका युजरने म्हटले आहे की, दीदी, कशाला असा स्टंट करायचा. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आम्ही वर्गणी काढतो आणि तुला पैसे देतो पण असे नको करु दिदी. तर अनेकांनी काय मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.